virat kohli twitter
क्रीडा

Team India Victory Parade: 'मां तुझे सलाम...' वानखेडेवर 33 हजार फॅन्ससह विराट अन् टीम इंडियाने गायलं वंदे मातरम - VIDEO

Ankush Dhavre

भारतीय खेळाडूंनी आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत दमदार कामगिरी केली आणि दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपवर नाव कोरलं. भारतीय संघाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला. यासह रोहित अँड कंपनीने भारतीय संघाचा आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा दुष्काळ संपवला.

हा विजय भारतीय क्रिकेटसाठी अतिशय महत्वाचा होता. त्यामुळे विजयाचा जल्लोषही तितकाच जोरदार करण्यात आला. दरम्यान या विजयानंतर भारतीय खेळाडूंनी वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट फॅन्सचे आभार मानले.

भारतीय खेळाडूंनी गायलं वंदे मातरम

भारतीय खेळाडू मायदेशी परतल्यानंतर आधी दिल्लीला जाणार आणि त्यानंतर मुंबईत येणार हे आधीपासूनच ठरलं होतं. नियोजित वेळापत्रकानुसार, भारतीय संघ ३ जुलै रोजी भारतात दाखल झाला. मायदेशी परतल्यानंतर भारतीय खेळाडू दिल्लीतील ICT Maurya हॉटेलमध्ये गेले. काही वेळ विश्रांती केल्यानंतर भारतीय खेळाडू चॅम्पियन्सची जर्सी परिधान करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी दाखल झाले. दरम्यान मोदींची भेट घेतल्यानंतर भारतीय खेळाडू मुंबईत येण्यासाठी रवाना झाले.

खेळाडूंनी गायलं वंदे मातरम

भारतीय खेळाडू मुंबईत दाखल झाल्यानंतर, मुंबईतील नरीमन पॉईंट ते मरीन ड्राईव्हपर्यंत ओपन बस परेड काढण्यात आली. त्यानंतर खेळाडू वानखेडे स्टेडियममध्ये दाखल झाले. इथे खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.यासह बीसीसीआयने जाहीर केलेलं १२५ कोटींचं बक्षीस देण्यात आलं. दरम्यान खेळाडूंनी स्टेडियममध्ये आलेल्या फॅन्सला अभिवादन केलं. त्यावेळी ३४ हजाराहूंन अधिक लोकांनी एकत्र वंदे मातरम गायलं. त्यावेळी हार्दिक पंड्या, रोहित शर्मा आणि विराट कोहलीने एकसुरात वंदे मातरम गायलं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. तसेच नेटकरी या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे.

भारतीय संघाचा शानदार विजय

भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत दमदार कामगिरी केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने या स्पर्धेतील एकही सामना गमावला नाही. स्पर्धेतील सेमिफायनलमध्ये भारतीय संघाने इंग्लंडचा एकतर्फी पराभव केला. त्यानंतर फायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने ७ धावांनी विजय मिळवत, दुसऱ्यांदा वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून १२ वर्षीय मुलीने संपवलं जीवन, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना

Marathi News Live Updates : भरधाव ट्रकने चिरडले; १० गाई दगावल्या, नागपुरमधील घटना

Boat Capsized: प्रवाशांना घेऊन जाणारी बोट समुद्रात बुडाली; ७८ जणांना जलसमाधी, थरारक VIDEO

ऋषभ पंतची एक चलाखी आणि...; रोहित शर्माने ३ महिन्यांनी सांगितलं कशी पालटली भारताने हरलेली बाजी!

Vidhan Sabha Election : बच्चू कडूंना सर्वात मोठा धक्का; एकुलता एक आमदार फुटला, शिंदे गटाने पळवला

SCROLL FOR NEXT