Virat Kohli Retires saam tv
Sports

Virat Kohli Retires: विराट 18 नंबरचीच जर्सी का घालायचा? कारण तुम्हालाही करेल भावूक!

Virat Kohli Retires: रोहित शर्मानंतर आता विराट कोहलीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमधून निवृ्त्ती जाहीर केली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून त्याने त्याचा निर्णय कळवलाय.

Surabhi Jayashree Jagdish

टीम इंडिया आणि विराट कोहलीच्या चाहत्यांना एक मोठा धक्का बसला आहे. हा धक्का म्हणजे टीम इंडियाचा किंग कोहली विराटने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित विराटने निवृत्तीची घोषणा केली आहे. रोहित शर्मानंतर विराट कोहलीनेही तडकाफडकी निवृत्ती जाहीर केल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

२००८ मध्ये भारतासाठी डेब्यू करणाऱ्या विराटने फलंदाजीमध्ये त्याचं नाणं खणखणीत वाजवलं आहे. त्याने १५ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५ हजारांहून अधिक रन्स केलेत. विराटपेक्षा जास्त धावा फक्त ५ फलंदाजांनी केल्याची माहिती आहे. पण यामध्ये कोणाचीही सरासरी त्याच्यापेक्षा चांगली नाही.

१८ नंबरची जर्सी

विराट कोहली १८ क्रमांकाची जर्सी घालतो. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने १९ वर्षांखालील वर्ल्डकप देखील जिंकला होता. त्यावेळीही कोहलीच्या जर्सीवर १८ क्रमांक होता. सहसा खेळाडूंना त्यांचा आवडता क्रमांक किंवा जन्मतारीख त्यांच्या जर्सीवर लिहितात. मात्र विराट कोहलीच्या बाबतीत असं नाही. तुम्हाला माहितीये का विराट १८ नंबरचीच जर्सी का घालतो.

वडिलांचं झालं होतं निधन

विराट कोहलीच्या वडिलांचं २००६ मध्ये निधन झालं होतं. त्यांच्या मृत्यूची तारीख १८ डिसेंबर होती. याच कारणामुळे विराट कोहलीने त्याचा जर्सी क्रमांक १८ ठेवलाय. ज्या दिवशी त्याच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरपलं त्या दिवशी विराट रणजी सामना खेळत होता. विराटच्या वडिलांची इच्छा होती की, त्याने एक दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळावं. विराटने २००८ मध्ये भारतासाठी डेब्यू केला. टीम इंडियामध्य एन्ट्री करताच तो नेहमीच त्याच्या वडिलांच्या स्मरणार्थ १८ क्रमांकाची जर्सी घालतो.

वडिलांच्या निधनानंतर दुसऱ्या दिवशी केलेली फलंदाजी

या दिवसी विराट कोहलीच्या वडिलांचं रात्री २ वाजता निधन झालं होतं. यानंतरही विराट दुसऱ्या दिवशी फलंदाजीला गेला होता. त्यावेळी तो केवळ १७ वर्षांचा होता. दिल्लीवर फॉलोऑनचा धोका होता अशातच विराट सामना खेळायला आला. त्याने ९० रन्सची खेळी खेळून टीमला साथ दिली.

निवृत्तीबाबत काय म्हणाला विराट?

12 मे रोजी म्हणजेच आज विराटने इन्स्टाग्रामवर निवत्तीची पोस्ट केली. यामध्ये त्याने म्हटलंय की, गेल्या १४ वर्षांपासून भारतासाठी टेस्ट क्रिकेट खेळतोय. या फॉरमॅटमुळे माझा प्रवास कुठे जाईल याची मी कधी कल्पनाच केली नव्हती. टेस्ट क्रिकेटने मला घडवलं आणि आयुष्यभर जपून ठेवावे असे धडे दिलेत. पांढऱ्या कपड्यांमध्ये खेळण्यात काहीतरी खूप खास आहे.

विराट त्याच्या पोस्टमध्ये पुढे लिहितो की, या फॉरमॅटपासून दूर जाणं हे माझ्यासाठी फार कठीण आहे. पण मला हा निर्णय योग्य वाटतोय. मी किक्रेटला माझं सर्व काही दिलं, मात्र क्रिकेटने मला माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त दिलंय. याने मला माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त दिलं. मी कृतज्ञतेने भरलेल्या मनाने पुढे जातोय. मी माझ्या टेस्ट करिअरकडे मागे वळून हसतमुखाने पाहेन.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : दिवसभरात कमीत कमी रिस्क घ्या; ५ राशींच्या नेत्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत, अन्यथा...

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Ayushman Bharat: ५ लाख नाही तर १० लाखांपर्यंत मोफत उपचार; कोणत्या कुटुंबांना होणार फायदा? वाचा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT