WTC final 2023 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमध्ये टीम इंडियाचा मोठ्या फरकाने पराभव झाला. टीम इंडियाच्या या पराभवानंतर फॅन्स आणि एक्सपर्ट्सकडून स्टार खेळाडूंवर टीका होताना दिसत आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीही सर्वांच्या निशाण्यावर आला आहे. विराटने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत आपल्या टिकाकारांना उत्तर दिलं आहे.
चिनी विचारवंत LAU TZU यांचं एक Quote विराटने शेअर केलं आहे. WTC 2023 फायनलमध्ये त्याच्या खराब शॉट सिलेक्शनवरुन त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. क्रिकेट फॅन्स आणि क्रिकेटच्या दिग्गजांकडून त्याच्या शॉट सिलेक्शनबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे.
काय आहे इन्स्टा स्टोरी?
या सर्वांना उत्तर देण्यासाठी विराटने 'Silence is the source of great strength ' हा कोट स्टोरीवर ठेवला आहे. (Latest sports updates)
विराटचा चुकीचा शॉट
विराट कोहलीकडून टीम इंडियाच्या चाहत्यांना खूप आशा होता. विराट जोवर क्रिजवर आहे तोवर टीम इंडियाचे जिंकण्याची शक्यता आहे, असं प्रत्येक चाहत्याला वाटत होतं. 444 धावाचां पाठलाग करण्यासाठी पाचव्या दिवशी मैदानात उतरल्यानंतर विराटने एक चूक केली.
कव्हर ड्राईव्ह खेळण्याच्या नादात तो स्टीव्ह स्मिथकडे कॅच देऊन बसला. विराट आऊट झाल्यानंतर तासाभरात उरलेला सर्व संघ तंबूत परतला आणि भारताचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन बनण्याचं स्वप्न लांबलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.