Cricket World Cup 2023 Schedule : वनडे वर्ल्डकपचं संभाव्य वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्याची तारीख ठरली

World Cup 2023 : भारतीय संघ पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईमध्ये पहिला सामना खेळेल.
ind vs pak
ind vs pak saam tv
Published On

IND vs PAK, World Cup Schedule: ICCच्या एकदिवसीय वर्ल्ड कप 2023चं आयोजन भारतात केलं जाणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा भारतात पार पडणार आहे. बीसीसीआयने या एकदिवसीय वर्ल्ड कपचे ड्राफ्ट शेड्युल आता जाहीर केलं आहे.

ESPN च्या वृत्तानुसार, स्पर्धेतील पहिला सामना ५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. पहिला सामना 2019 च्या अंतिम फेरीतील इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होईल. भारतीय संघ तीन दिवसांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईमध्ये पहिला सामना खेळेल.

वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक क्रिकेट फॅन प्रतीक्षा असते ती भारत-पाकिस्तान सामन्याची. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 15 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे.

T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये जेव्हा भारत-पाकिस्तान यांच्यात सामना झाला त्यावेळी संपूर्ण मेलबर्न क्रिकेट स्टेडियम भरले होते. 11 नोव्हेंबर रोजी टीम इंडिया बंगळुरूमध्ये शेवटचा ग्रुप सामना खेळणार आहे. (Latest sports updates)

ind vs pak
WTC Final 2023: WTC च्या अंतिम सामन्यात पराभूत होताच रोहित शर्मा ICC वरच भडकला! म्हणाला...

बीसीसीआयने ड्राफ्ट शेड्यूल आयसीसीसोबत शेअर केले आहे. त्यानंतर पुढील आठवड्याच्या सुरुवातीला अंतिम वेळापत्रक जाहीर होईल. वर्ल्ड कपचा अंतिम सामना हा 19 नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामनाही अहमदाबाद येथे होणार आहे.

ind vs pak
Ravi Shastri On Team India Loss: 'फक्त २०-२५ दिवसांपूर्वी सराव करून काही होणार नाही..' पराभवानंतर दिग्गज क्रिकेटपटू भडकले

टीम इंडियाचे वेळापत्रक

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 8 ऑक्टोबर, चेन्नई

  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान, 11 ऑक्टोबर, दिल्ली

  • भारत विरुद्ध पाकिस्तान, 15 ऑक्टोबर, अहमदाबाद

  • भारत विरुद्ध बांगलादेश, 19 ऑक्टोबर, पुणे

  • भारत विरुद्ध न्यूझीलंड, 22 ऑक्टोबर, धर्मशाला

  • भारत विरुद्ध इंग्लंड, 29 ऑक्टोबर, लखनौ

  • भारत वि क्वालिफायर, 2 नोव्हेंबर, मुंबई

  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 5 नोव्हेंबर, कोलकाता

  • भारत वि क्वालिफायर, 11 नोव्हेंबर, बंगळुरू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com