Ravi Shastri On Team India Loss: 'फक्त २०-२५ दिवसांपूर्वी सराव करून काही होणार नाही..' पराभवानंतर दिग्गज क्रिकेटपटू भडकले

IND VS AUS WTC FINAL: या पराभवानंतर माजी भारतीय क्रिकेटपटूने मोठं वक्तव्य केलं आहे.
Team India
Team Indiasaam tv
Published On

IND VS AUS: लंडनच्या ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली.

यासह भारतीय संघाची आयसीसीची ट्रॉफी जिंकण्याची प्रतीक्षा आणखी लांबली आहे. २०१३ नंतर भारतीय संघाला आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकता आली नाहीये. दरम्यान या पराभवानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Team India
Rohit Sharma On Loss: IPL मुळे गमावला WTC चा अंतिम सामना? दारुण पराभवानंतर काय म्हणाला रोहित शर्मा?

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी ४४४ धावांची गरज होती. मात्र भारतीय संघाला अवघ्या २३४ धावा करता आल्या. हा सामना भारतीय संघाने २०९ धावांनी गमावला आहे.

दरम्यान या पराभवाबाबत बोलताना माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक रवी शास्त्री म्हणाले की, 'खरं सांगायचं झालं तर २०-२५ दिवसांपूर्वी सराव करून काही होणार नाही. तुम्हाला आयपीएल स्पर्धा खेळणं टाळावं लागेल किंवा बीसीसीआयने यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. जसं की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना जूनमध्ये असेल तर वेळापत्रकात काही बदल केला जाऊ शकतो.' (Latest sports updates)

Team India
Virat Kohli Wicket: विराट कोहलीच्या कॅचने टीम इंडियाच्या चाहत्यांचं काळीज तोडलं! खऱ्या क्रिकेट फॅनने VIDEO पाहायलाच हवा

विजयासाठी होती ४४४ धावांची गरज..

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाने ४४४ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या जोडीने चांगली सुरुवात करून दिली होती.

मात्र शुभमन गिल १८ धावांवर झेल बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर रोहित शर्माने देखील ४३ धावांवर पॅव्हेलियनची वाट धरली. रोहित पाठोपाठ पुजाराने देखील बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.

अजिंक्य रहाणे आणि विराटने मिळून अर्धशतकी भागीदारी केली होती. मात्र शेवटच्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारतीय संघाला दुहेरी धक्का बसला. विराट कोहली आणि रविंद्र जडेजा बाद होऊन माघारी परतले. त्यानंतर भारतीय संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. भारतीय संघाचा संपूर्ण डाव अवघ्या २३४ धावांवर संपुष्ठात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com