Virat Kohli  x
Sports

Virat Kohli : ३०० कोटींची ऑफर विराट कोहलीने नाकारली, बऱ्याच वर्षांपासूनचे असलेले संबंध तोडले; जाणून घ्या नेमकं कारण

Virat Kohli News : विराट कोहलीला पुमा या आंतरराष्ट्रीय ब्रँडने ३०० कोटी रुपयांची ऑफर दिली होती. विराटने ही ऑफर का नाकारली याची चर्चा होत आहे. त्याच्या निर्णयामागील कारण समोर आले आहे.

Yash Shirke

Virat Kohli News Update : भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली सध्या आयपीएल खेळण्यात व्यस्त आहे. तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळत आहे. विराटने सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवरील जाहिरातीच्या पोस्ट डिलीट केल्या. याशिवाय विराट कोहलीने पुमा ब्रँडसोबत करार संपवला असल्याची माहिती समोर आली आहे. विराटला पुमासोबत यापुढे काम करायचे नसल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

पुमा कंपनीसोबत करार संपवल्याने विराट कोहली सध्या चर्चेत आहे. २०१७ मध्ये विराट कोहलीने ८ वर्षांसाठी पुमा कंपनीसह करार केला होता. याच्या मोबदल्यात विराटला ११० कोटी रुपयांचे मानधन मिळाले होते. पुढील ८ वर्षांसाठी करारबद्ध होण्यासाठी पुमा ब्रँडने विराट कोहलीला ३०० रुपयांची ऑफर देण्यात आली होती. पण ही ऑफर विराटने नाकारल्याची माहिती समोर आली आहे.

विराट कोहलीने ३०० कोटी रुपयांची ऑफर नाकारल्यानंतर पुमा कंपनीने अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले. यात कंपनीने विराट कोहलीला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. एकत्र काम करत असतानाचा वेळ संस्मरणीय होता. आम्ही विराटसोबत अनेक असाधारण मोहिमा केल्या होत्या असे पुमा कंपनीने म्हटले आहे.

एका रिपोर्टनुसार, स्पोर्टिंग बियॉन्ड ही फर्म विराट कोहलीचे कामकाज पाहते. विराट कोहली आता अ‍ॅजिलिटास या कंपनीसोबत भागीदारी करणार आहे. तो या कंपनीचा सहसंस्थापक देखील आहे अशी माहिती रिपोर्ट्सनुसार मिळाली आहे. कोहलीला त्याचा वन८ कम्यून बँड आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जायचा आहे. यातून विराट कोहली क्रिकेटनंतर त्याच्या कंपनीवर लक्ष देणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

SCROLL FOR NEXT