Virat Kohli Breaks rickey ponting record  twitter
Sports

Virat Kohli Record List: वानखेडे मैदान विराट वादळानं शहारलं; रिकी पॉन्टिंगला मागे टाकत वनडेत सर्वाधिक धावांच्या बाबतीत तिसऱ्या स्थानी

Virat Kohli Record List: विश्वचषकाच्या स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडच्या विरोधात खेळताना विराटने शतकी खेळी करत रिकी पॉटिंगच्या धावांचाही विक्रम मोडला आहे.

Vishal Gangurde

Virat Kohli Record List:

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली या स्पर्धेत तुफान फॉर्मात आहे. वानखेडे मैदानावर विराटकडून न्यूझीलंडच्या गोलंदाजी धुलाई सुरु आहे. विराटच्या आधी रोहित शर्मा आणि शुभमनने गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. त्यानंतर विराटने मैदानावर फलंदाजीचा करिष्मा दाखवला आहे. विश्वचषकाच्या स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडच्या विरोधात खेळताना विराटने शतकी खेळी करत रिकी पॉटिंगच्या धावांचाही विक्रम मोडला आहे. (Latest Marathi News)

विराट कोहली आंतरराष्ट्रीय सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. आता सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराटच्या आधी फक्त दोन फलंदाज आहेत. विराटने आजच्या सामन्यात धमाकेदार खेळी करत रिकी पाँटिगच्या धावांचा विक्रम मोडला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर सचिन तेंडुलकरचं नाव आहे. सचिनच्या नावावर वनडे फॉरमॅटमध्ये १८,४२६ धावा आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकाच्या कुमार संगकाराचं नाव आहे. त्याच्या नावावर १४,२३४ धावा आहेत. संगकारानंतर आता विराटने स्थान पटकावलं आहे.

विराटच्या नावावर १३ ,७२० हून अधिक धावा झाल्या आहेत. वनडे क्रिकेट फॉरमॅटमध्ये रिकी पाँटिगच्या १३ हजार ७०४ धावा आहेत. याच सामन्यात विराटने रिकी पाँटिगचा विक्रम मोडला आहे. तर पाचव्या स्थानावर लंकेचा सनथ जयसूर्या असून त्याच्या १३, ४३० धावा आहेत.

वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा

सचिन तेंडुलकर : 18,426

कुमार संगकारा : 14,234

विराट कोहली : 13,717

रिकी पॉटिंग : 13,704

सनथ जयसूर्या : 13,430

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

SCROLL FOR NEXT