Virat Kohli record in world cup he Never Scored 50+ Runs in Successful run Chasing in World Cup history  Saam tv news
Sports

World Cup 2023: वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाच्या चिंतेत वाढ! विराटने वाढवलं टेन्शन

Virat Kohli Record In World Cup: विराटच्या रेकॉर्डने क्रिकेट फॅन्सचं टेन्शन वाढवलं आहे.

Ankush Dhavre

World Cup 2023:

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. ५ ऑक्टोबर रोजी इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.

तर भारतीय संघाचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाची चिंता वाढवणारा रेकॉर्ड समोर आला आहे.

विराट कोहली हा भारतीय संघातील प्रमुख फलंदाज आहे. जर भारतीय संघाला वर्ल्डकप जिंकायचा असेल तर विराट कोहलीची बॅट चालणं अतिशय महत्वाचं असणार आहे.

मात्र तुम्हाला माहितेय का, वर्ल्डकप स्पर्धेत धावांचा पाठलाग करताना विराट कोहली आतापर्यंत एकही अर्धशतक झळकावू शकलेला नाही. मात्र यावेळी तो ज्या फॉर्ममध्ये आहे ते पाहता तो हा दुष्काळ संपवू शकतो.

वर्ल्डकप स्पर्धेतील रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर,विराटने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. मात्र नॉकआऊट फेरीत त्याला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. विराट कोहली २०११ मध्ये आपला पहिला वर्ल्डकप खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता.

त्यावेळी एमएस धोनी भारतीय संघाचा कर्णधार होता. या स्पर्धेत बांगलादेशविरूद्ध झालेल्या पहिल्याच सामन्यात त्याने शतकी खेळी केली होती. २०११ नंतर त्याने २०१५ आणि २०१९ वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. हा त्याचा चौथा वर्ल्डकप असणार आहे. (Latest sports updates)

वर्ल्डकप स्पर्धेत असा राहिलाय रेकॉर्ड..

विराट कोहली चौथ्यांदा वनडे वर्ल्डकप खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. त्याच्या वर्ल्डकप स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत खेळलेल्या २६ सामन्यांमध्ये ४६.८१ च्या सरासरीने १०३० धावा केल्या आहेत.

यादरम्यान त्याने २ शतके आणि ६ अर्धशतके झळकावली आहेत. तर १०७ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी राहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Womens Fashion : स्टाइल आणि क्लासचा परफेक्ट मेळ! सण, ऑफिस आणि रोजच्या वापरासाठी हँडबैग्सच्या खास ट्रेंडिंग डिझाइन्स

Pension Rules : रिटायरमेंटच्या 4 वर्षे आधीच वेतन-पेन्शनची तपासणी! केंद्र सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय

Maharashtra News Live Update: जोगेश्वरी पूर्वेत मातीने भरलेला डंपर बेस्ट बसवर कलंडला; महिला प्रवासी जखमी

Thane Crime : वर्गमित्रांनीच केला घात; संध्याकाळच्या वेळेला घराबाहेर बोलावलं, निर्जनस्थळी नेलं अन्... धक्कादायक कारण उघड

अभिजीत दीपके यांना जामीन मंजूर; न्यायालयानं कोणत्या ठेवल्या अटीशर्ती?

SCROLL FOR NEXT