
भारताची भालाफेक खेळाडू अन्नू राणीने चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कमाल केली आहे. भालाफेकमध्ये अन्नू राणीने सुवर्णपदक जिंकलं आहे. अन्नूने सुवर्ण जिंकून इतिहास रचला आहे. (Latest Marathi News)
अन्नू राणीने मंगळवारी भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं आहे. अन्नूने तिच्या चौथ्या यशस्वी प्रयत्नात ६२.९२ मीटर लांब भाला फेकला. त्याचबरोबर श्रीलंकेच्या नदीशा दिलहानने रौप्यपदक जिंकलं.
आशियाई क्रीडा स्पर्धेत आज २ सुवर्णपदक जिंकले आहेत. पारुलने ५ हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकलं आहे. तर भालाफेकमध्ये अन्नू राणीने सुवर्णपदक जिंकलं आहे.
अन्नू राणीने आशियाई क्रीडा स्पर्धेतील १५ वे सुवर्णपदक जिंकलं आहे. सुवर्णपदक जिंकल्यानंतर अन्नू भारताचा झेंडा अभिमानाने फडकवताना दिसली.
अन्नू राणी ही मेरठ येथील रहिवासी आहे . अन्नू राणीने नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत ६२.३४ मीटर भाला फेकून नाव उंचावलं होतं. अन्नूला लहाणपणापासून भालाफेकमध्ये नाव कमावण्याची इच्छा होती.
अन्नूकडे भाला विकत घेण्याचेही पैसे नव्हते. त्यामुळे अन्नूने ऊसाच्या भाल्यापासून सराव केला. जिल्हा पातळीवर खेळता-खेळता अन्नू आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली.
भारताच्या पारुल चौधरीनं ५ हजार शर्यतीत सुवर्ण पदक मिळवलंय. पारुलने काल ३ हजार मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक जिंकले होतं. त्यानंतर तिने पुन्हा सुवर्ण इतिहास लिहिला आहे. पारुलनं शेवटच्या ३० मीटरमध्ये पुनरागमन करताना १५ मिनिटे १४.७६ सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकलं आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.