icc champions trophy saam tv
Sports

भारताच्या या ३ खेळाडूंकडे दुसऱ्यांदा Champions Trophy जिंकण्याची संधी! २०१३ मध्ये गाजवलेलं मैदान

ICC Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघात ३ खेळाडू असे आहेत जे २०१३ मध्येही संघाचा भाग होते.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा थरार पाकिस्तान आणि मुंबईत रंगणार आहे. २०१७ मध्ये शेवटची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा रंगली होती. या स्पर्धेतील फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तन हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

आता ८ वर्षांनंतर पुन्हा एकदा ही स्पर्धा होणार आहे. भारताने २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत १२ वर्षे उलटून गेली आहेत. यादरम्यान भारतीय संघात बरेच बदल देखील झाले आहेत. दरम्यान भारतीय संघातील ३ खेळाडू असे आहेत जे दुसऱ्यांदा ही ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. दरम्यान कोण आहेत ते खेळाडू? जाणून घ्या.

केव्हा होणार भारतीय संघाचे सामने?

भारताने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. आता रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध रंगणार आहे. तर २३ फेब्रुवारीला होणारा सामना हा भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.

कारण भारताचा संघ पाकिस्तानचा सामना करणार आहे. यापूर्वी झालेल्या फायनल सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे भारतीय संघ पराभवाची व्याजासह परतफेड करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. त्यानंतर भारताचा साखळी फेरीतील शेवटचा सामना २ मार्चला न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. हे सामने जिंकले, तर भारतीय संघाला सेमीफायनल आणि फायनल खेळण्याची संधी मिळणार आहे.

या ३ खेळाडूंना दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची संधी

भारतीय संघाने ज्यावेळी २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यावेळी एमएस धोनी भारताचा कर्णधार होता. तर विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा हे संघाचा भाग होते. तिघांनीही ही स्पर्धा जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. आता दोघेही पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे या खेळाडूंवर मोठी जबाबदारी असणार आहे. तर संघात असलेले उर्वरीत खेळाडू पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार आहेत.

विराट - रोहितची चॅम्पियन्स ट्रॉफीतील कामगिरी

विराट कोहली आणि रोहित शर्माची या स्पर्धेतील कामगिरी कशी राहिलीये, यावर एक नजर टाकूया. रोहित शर्माची या स्पर्धेतील कामगिरी पाहिली, तर रोहितने आतापर्यंत १० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याला ४८१ धावा करता आल्या आहेत. तर विराट कोहलीची या स्पर्धेतील कामगिरी पाहिली, तर त्याने आतापर्यंत १३ सामन्यांमध्ये ५२९ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेचं ठरलं, जागांवर अडलं? युतीच्या घोषणेला जागावाटपाचा अडसर?

Maharashtra Live News Update: मनमाड-येवला मार्गावरील अंकाई शिवारात टँकरची रिक्षाला धडक, 6 जण जखमी

Yerwada jail : धक्कादायक! येरवडा कारागृहात हाणामारी; कंबर आणि डोक्यात फरशी घातली, आरोपीचा मृत्यू

बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा निवडणूक प्रचारात; मतदारांना ‘या’ पक्षाला मतदानाचं आवाहन|VIDEO

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT