दुबई : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ऑलराउंडर शेन वॉटसननं (shane watson) भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या (virat kohli) फलंदाजीचं कौतुक केलं आहे. कोहली सुपर ह्यूमन (super human) असून तो टेस्ट क्रिकेटमध्ये (test cricket) असणाऱ्या पाच बड्या फलंदाजांच्या पुढे असल्याचं वॉटसननं म्हटलं आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, न्युझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ, इंग्लंडचा टेस्ट कॅप्टन जो रुट या दिग्गज खेळाडूंच्याही पुढे विराट कोहली असल्याचं वॉटसनचं म्हणणं आहे. (Virat Kohli News updates)
आयसीसीने (ICC) त्यांच्या वेबसाईट्सवर दिलेल्या एका रिपोर्टनुसार, जगातील नंबर वन टेस्ट फलंदाज मार्नस लाबुशेननं २६ टेस्ट मॅच खेळल्या असून ५४.३१ च्या सरासरीने धावा करुनही मार्नसचा समावेश या लिस्टमध्ये नाही . कारण या बिग फाईव्हमध्ये जे खेळाडू ४० सामने खेळले आहेत त्यांनाच प्राधान्य देण्यात आलंय. वॉटसनने विराट कोहलीला बिग फाईव्हमध्ये अव्वल स्थानावर ठेवलं असून बाबर आझम दुसऱ्या स्थानावर आहे. स्मिथ, विल्यमसन आणि रुट हे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहे.
असं आहे सर्व खेळाडूंचं प्रदर्शन
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने १०१ टेस्ट मॅचच्या १७१ इनिंग्समध्ये ४९.९५ च्या सरासरीनं ८०४३ धावा कुटल्या आहेत. बाबर आझमने ४० टेस्टमध्ये ७१ इंनिंग्समध्ये ४५.९८ च्या सरासरीनं २८५१ धावा फटकावल्या आहेत. तर स्टिव्ह स्मिथने ८५ सामन्यांत १५१ इनिंग्समध्ये ५९.७७ च्या सरासरीनं ८०१० धावा केल्या आहेत. विल्यमसनने ८६ सामन्यात १५० इनिंग्समध्ये ५३.५७ च्या सरासरीनं ७२७२ धावा केल्यात. तर जो रुटने ११७ टेस्टमध्ये २१६ इनिंग्समध्ये ४९.१९ च्या सरासरीनं ९८८९ धावा फटकावल्या आहेत.
कोहली सुपर ह्यूमन आहे
आयसीसीच्या वेबसाईटने वॉटसनच्या हवाल्यानं दिलेली माहिती अशी की, ' कोहली सुपर ह्यूमन आहे. सर्वकाही करण्यात तो सक्षम आहे. मैदानात सामना सुरु असताना तो उत्तम प्रदर्शन करत धावांचा डोंगर उभा करतो. कोहलीला आयसीसी टेस्ट फलंदाजांच्या क्रमवारीत दहाव्या स्थानावर ठेवण्यात आलं आहे. कोहलीनं २७ टेस्ट शतक आणि २८ अर्धशतकांची खेळी केलीय. तसंच आता त्याच्या फलंदाजीची सरासरी ५० च्या खाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.