मुंबई इंडियन्सचा सलग पाचव्यांदा पराभव; 'या' फॉर्म्युलानं पुन्हा होणार चॅम्पियन

Mumbai Indians
Mumbai Indians Saam Tv
Published On

पुणे : आयपीएलमध्ये (IPL) पाचवेळा चॅंपीयन राहिलेली मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यंदाच्या मोसमात मात्र दमदार कामगिरी करत नाहिये. सलग चारवेळा प्रतिस्पर्धी संघासोबत पराभव पत्कारावा लागल्याने मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी (Nita Ambani) यांनी सर्व खेळाडूंशी संवाद साधला होता. खेळाडूंना धीर देऊन पुढच्या सामन्यात जिंकण्यासाठी त्यांचा आत्मविश्वास अंबानी यांनी वाढवला होता. परंतु, 'क्रिकेट अनिश्चितताओंका खेल है' असं म्हटलं जातं त्यामुळे क्रिकेटच्या मैदानात काहीही घडू शकतं. तसंच काहीसं बुधवारी पंजाब किंग्ज (Punjab kings) आणि मुंबई इंडियन्समध्ये पुण्याच्या एमसीएच्या मैदानात झालेल्या सामन्यात घडलं. पंजाबने मुंबईला १९९ धावांच लक्ष्य दिलं होतं. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या आक्रमक फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली. परंतु, त्यांची गाडी १८६ धावांवरच थांबली आणि मुंबई इंडियन्सचा सलग पाचवा पराभव झाला.

Mumbai Indians
रोहितच्या पदरी आणखी एक निराशा; हंगाम सुरु झाल्यापासून भरला 36 लाखांचा दंड!

मुंबई इंडियन्स यंदाच्या IPL मोसमातही चॅंपीयन बनू शकते

आयपीएल सामन्यांमध्ये सलग पाचवेळा पराभूत झालेल्या मुंबई इंडियन्सला निराश होण्यची आवश्यकता नाहीये. मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा चॅंपियन होऊ शकते. त्यासाठी कर्णधार रोहित शर्माच्या टीमला जुन्या फॉर्म्युल्याचा वापर करावा लागेल. मुंबई इंडियन्सने २०१५ च्या आयपीएल हंगामात सुरुवातीच्या सहा सामन्यांमध्ये फक्त एका सामन्यात विजय मिळवला होता. त्यावेळीही कर्णधार रोहित शर्माकडेच मुंबई इंडियन्सचं नेतृत्व होतं. त्यावेळी मुंबईने एक रणनीती आखली होती. त्यानंतर मुंबईने इतर सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत प्ले ऑफमध्ये आपलं स्थान पक्क केलं होतं. त्यानंतर आयपीएलच्या फायनलमध्ये विजय मिळवून मुंबईने दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले होते.

IPL 2015 : चॅंपीयन मुंबईचा असा होता प्रवास

सुरुवातीच्या सहा सामने, फक्त १ सामन्यात विजय

१) कोलकाता नाईट रायडर्सने मुंबईला ७ विकेट्सने पराभूत केलं.

२) मुंबई इंडियन्सला किंग्ज पंजाबने १८ धावांनी हरवलं

३) राजस्थान रॉयल्सने मुंबईचा ७ विकेट्सने पराभव केला

४) सीएसकेने मुंबईला ६ विकेट्सने पराभूत केलं

५) मुंबईने आरसीबीवर १८ धावांनी विजय मिळवला

६) दिल्लीने मुंबईला ३७ धावांनी पराभूत केलं.

एक विजय मिळाल्यानंतर पुन्हा वापसी

७) मुंबईने सनरायजर्सला २० धावांनी पराभूत केलं

८) मुंबईने राजस्थान रॉयल्सवर ८ धावांनी विजय मिळवला.

९) मुंबईने पंजाबला २३ धावांनी पराभूत केलं

१०) मुंबईने दिल्लीवर ५ विकेट्सने विजय मिळवला

११) मुंबईने चेन्नईला ६ विकेट्सने हरवलं

१२) आरसीबीने मुंबईला ३९ धावांनी पराभूत केलं

१३) मुंबईने कोलकाताला ५ धावांनी हरवलं

१४) मुंबईने सनरायजर्सवर ९ विकेट्सने विजय मिळवला

१५) मुंबईने चेन्नईचा २५ धावांनी पराभव केला (क्वालीफायर १)

१६) मुंबईने चेन्नईला ४१ धावांनी पराभूत केलं (फायनल)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com