Virat Kohli  Saam Tv
क्रीडा

IND VS AUS 2nd Test:मैदानात पाऊल ठेवताच विराटनं पूर्ण केलं खास 'शतक', असा कारनामा करणारा ठरला दुसराच भारतीय

दरम्यान ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरताच त्याच्या नावे एका मोठया विक्रमाची नोंद झाली आहे.

Saam TV News

IND VS AUS 2nd Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात ४ कसोटी सामन्यातील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही.

त्यामुळे विराट कोहली लवकरच फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला होता. दरम्यान ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरताच त्याच्या नावे एका मोठया विक्रमाची नोंद झाली आहे. (Latest Sports Updates)

ऑस्ट्रेलियाविरुद्व फलंदाजी करण्यासाठी उतरताच विराटने एक खास शतक पूर्ण केलं आहे. तो ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध आपली १०० वी इनिंग खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. यापूर्वी केवळ सचिन तेंडुलकर असा पराक्रम करू शकला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक इनिंग खेळण्याचा विक्रम..

सचिन तेंडुलकर हा ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध तब्बल १४४ वेळा फलंदाजी करण्यासाठी उतरला आहे. तर दुसऱ्या स्थानी विराट कोहली आहे.

विराट १०० व्या वेळी ऑस्ट्रेलिया संघाविरुद्व फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. तर या यादीत राहुल द्रविड आणि एमएस धोनी संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानी आहेत. दोघेही ९६-९६ वेळेस फलंदाजी करण्यासाठी मैदानात आले आहेत.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तरं, दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला हवी तशी कामगिरी करता आली नाही. या डावात केएल राहुल १७ धावा करत माघारी परतला. तर रोहित शर्माने ३२ धावांचे योगदान दिले. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रापर्यंत भारतीय संघाची धावसंख्या ४ गडी बाद ८८ धावा होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wedding Rituals Varmala Cermony: लग्नात वर-वधूला वरमाला का घालतात? नेमकं कारण काय, जाणून घ्या...

हे आहेत डोके आणि मानेचे प्रमुख कर्करोग, प्रतिबंधासाठी जीवनशैलीत करा हे बदल...

IND vs AUS: टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण, विराट गेला होता हॉस्पिटलमध्ये, सरावावेळी २ फलंदाज जायबंदी

Hydrogen Railway: देशात लवकरच येणार हायड्रोजनवर चालणारी रेल्वे; वैशिष्ट्ये काय? जाणून घ्या

Pune News : मुलांची परीक्षा फी भरली, आयोगानं थेट उमेदवाराला पाठवली नोटीस!

SCROLL FOR NEXT