Virat Kohli Records saam tv
क्रीडा

Asia Cup 2023: किंग कोहली रचणार इतिहास! अवघ्या १०२ धावा करताच सचिनला या बाबतीत सोडणार मागे

Virat Kohli Records: विराटला एक मोठा रेकॉर्ड मोडण्याची संधी असणार आहे.

Ankush Dhavre

Fastest 13000 Runs In ODI:

भारत- पाकिस्तान हे दोन्ही संघ हाय व्हॉल्टेज सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. येणारा शनिवार हा क्रिकेट चाहत्यांसाठी मेजवानी असणार आहे. कारण याच दिवशी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

क्रिकेट चाहत्यांना मनापासून असं वाटत असेल की, विराटने फलंदाजीला येऊन पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करावी. दरम्यान १०२ धावा करताच विराटच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद होणार आहे.

विराट वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत २७५ सामन्यांमध्ये २६५ वेळेस फलंदाजीला आला आहे. यादरम्यान ४० वेळेस नाबाद राहून त्याने १२८९८ धावा केल्या आहेत. विराटने आतापर्यंत ४६ शतके झळकावली आहेत.

पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात १०२ धावा करताच विराटच्या नावे वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १३००० हजार धावा करण्याची नोंद होणार आहे. या बाबतीत तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलरलाही मागे सोडणार आहे.

विराट कोहलीला सचिनचा हा मोठा रेकॉर्ड मोडण्यासाठी १ नव्हे तर ५५ संधी असणार आहेत. ५५ संधी असल्या तरी हा खास रेकॉर्ड पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात व्हावा असंच भारतीय क्रिकेट चाहत्यांना वाटत असावं.

सचिनने ३२१ डावांमध्ये १३००० धावा पूर्ण केल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू रिकी पाँटींगने हा कारनामा ३४१ डावांमध्ये करून दाखवला होता. श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू कुमार संगकाराने ३६३ डावांमध्ये १३००० हजार धावा पुर्ण केल्या होत्या. (Latest sports updates)

वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १३००० धावा पूर्ण करणारे फलंदाज..

सचिन तेंडुलकर - ३२१ डाव

रिकी पाँटींग- ३४१ डाव

कुमार संगकारा - ३६३ डाव

सनथ जयसूर्या - ४१६ डाव

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricketer Accident: वेस्टइंडीजच्या स्टार खेळाडूचा भीषण अपघात! कारचा झालाय चुराडा

Pune Politics: मतदानापूर्वीच पुण्यात मनसेला खिंडार, अनेक पदाधिकाऱ्यांनी 'तुतारी' घेतली हाती

Maharashtra News Live Updates: बारामतीमध्ये जय पवार बाईक रॅलीमध्ये सहभागी

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

SCROLL FOR NEXT