विराट कोहली २०२३ मध्ये भारतीय संघासाठी सुपरहिट ठरला आहे. माजी कर्णधाराने वनडे आणि कसोटीत धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने सर्व फॉरमॅटमध्ये मिळून ७ शतकं झळकावली आहेत. (Virat Kohli Record)
वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारतीय संघाला (Team India) फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. मात्र विराट या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. येत्या २६ डिसेंबरपासून भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत दोन हात करताना दिसून येईल. दरम्यान या सामन्यात विराटला एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे.
या सामन्यात विराटला श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराचा रेकॉर्ड मोडण्याची संधी असणार आहे. तो मोठा रेकॉर्ड मोडण्यापासून केवळ ६६ धावा दुर आहे. हा रेकॉर्ड तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मोडू शकतो. (Most Runs In Calendar Year)
विराट कोहली हा एकाच वर्षात सर्वाधिक वेळेस २००० धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. या यादीत कुमार संगकारा अव्वल स्थानी आहे. संगकारा आणि विराट कोहली या दोघांनी मिळून आतापर्यंत संयुक्तरित्या ६-६ वेळेस २००० धावांपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. (Latest sports updates)
कुमार संगकारा -६ वेळेस
विराट कोहली- ६ वेळेस
महेला जयवर्धने - ५ वेळेस
सचिन तेंडूलकर- ५ वेळेस
जॅक कॅलिस- ४ वेळेस
मात्र या ६६ धावा विराटला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यातच करावा लागणार आहे. कारण हा भारतीय संघाचा या वर्षातील शेवटचा सामना असणार आहे. विराटने यापूर्वी २०१२,२०१४,२०१६,२०१७,२०१८ आणि २०१९ मध्ये २००० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. तर संगकाराबद्दल बोलायचं झालं तर त्याने २००४,२००६,२००९, २०११, २०१२ आणि २०१३ मध्ये हा कारनामा केला होता. विराटने आतापर्यंत यावर्षी १९३४ धावा केल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.