Virat Kohli Viral Video X
Sports

Virat Kohli : तुझ्या कोचला ओळखतो, २० वर्षांपासून...! सामन्यात विराट कोहलीची 'दादागिरी', Video व्हायरल

Virat Kohli Viral Video : पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या सामन्यात काल आरसीबीचा विजय झाला. या सामन्यातला विराट कोहलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Yash Shirke

IPL 2025 : विराट कोहली हा क्रिकेटच्या मैदानात आक्रमक असतो. कालच्या पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या सामन्यात विराटचे आक्रमक रुप पाहायला मिळाले. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर कॅचआउट झाल्यानंतर विराटने उडी मारली आणि रोमारियो शेपर्टने त्याला कडेवर उचलून घेतले. त्यानंतर नेहाल वढेराला रनआउट केल्यानंतरही विराटने खास सेलिब्रेशन केले. कालच्या सामन्यातील विराटचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सध्या सोशल मीडियावर विराट कोहलीच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये विराट कोहली पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज हरप्रीत बरारची मस्करी करत पंजाबीमध्ये काहीतरी बोलत असल्याचे दिसते. '२० वर्षांपासून मी इथे आहे. मी तुझ्या कोचलापण ओळखतो. आता तुझा हात बरा झालाय असं दिसतंय, फास्ट बॉल टाक आणि स्टंप उडवून देशील', असे विराटने पंजाबीत बरारला म्हटले.

विराट कोहलीने काल ५४ चेंडूंमध्ये नाबाद ७३ धावा केल्या. विराटच्या कालच्या संयमी खेळीमुळे बंगळुरूचा विजय झाला. सामना जिंकल्यानंतर विराट कोहलीने पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरला चिडवत सेलिब्रेशन केले. यानंतर विराट श्रेयसजवळ जाऊन काहीतरी बोलला. त्यावरुन श्रेयस अय्यर नाराज झाल्याचे पाहायला मिळाले.

१८ मार्च रोजी चिन्नास्वामी स्टेडियमवर पंजाब किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला होता. या पराभवाचा वचपा कालच्या सामन्यात आरसीबीच्या संघाने काढला. या सामन्यात गोलंदाजी-फलंदाजी या दोन्ही विभागात बंगळुरूचा संघ पंजाबच्यापेक्षा वरचढ ठरला. सध्या आरसीबीचा संघ पॉईंट्स टेबलवर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Birthday Gift Ideas: लहान मुलांच्या वाढदिवसाला देता येतील असे 5 रिटर्न गिफ्ट्स

Maharashtra News Live Update: ४०० कोटींची जमीन ५६ कोटींना देण्याचा घाट, वरळीतील भूखंडाच्या भाडेपट्ट्यावरून वाद

Aadhaar Card Update: आधार कार्ड अपडेट करायचेय? नाव, पत्ता, जन्मतारीख बदलण्यासाठी लागतील ही कागदपत्रे

District Bank Elections: सुप्रीम कोर्टाचा सहकार सम्राटांना मोठा धक्का, २० दिग्गज नेत्यांवर अपात्रतेची टांगती तलवार? यादीत कुणाची नावं?

Satin Silk Saree: महिलांसाठी सॅटिन सिल्क साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न नक्की ट्राय क

SCROLL FOR NEXT