RCB twitter
Sports

RCB Captain: RCB चा कॅप्टन ठरला! डू प्लेसिसनंतर या खेळाडूला मिळणार जबाबदारी

Royal Challengers Bengaluru Captain For IPL 2025: आगामी हंगामापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाची जबाबदारी स्टार भारतीय खेळाडूकडे सोपवली जाऊ शकते.

Ankush Dhavre

IPL 2025 ,RCB Captain: आयपीएल २०२५ स्पर्धेसाठीचा मेगा लिलाव सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये पार पडला. या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने २२ खेळाडूंचा संघ निवडला आहे. आगामी हंगामापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने कर्णधार फाफ डू प्लेसिसला रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यामुळे या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ कर्णधाराच्या शोधात असणार, अशी शक्यता वर्तविली जात होती.

मात्र त्यांनी रिषभ पंत आणि केएल राहुलला संघात घेण्यासाठी हवा तितका जोर लावला नाही. त्यामुळे आगामी हंगामात विराट कोहलीच संघाचा कर्णधार होणार, अशी चर्चा सुरु झाली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने या लिलावात जोश हेझलवूडवर सर्वात मोठी बोली लावली. त्याला १२.५० कोटींची बोली लावत संघात स्थान दिलं. तर रिषभ पंत आणि केएल राहुलवर ११ कोटींच्या पुढे बोली लावलीच नाही.

दरम्यान टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ विराटला पुन्हा एकदा कर्णधार बनवण्याच्या तयारीत आहे. या संघाने केएल राहुल आणि रिषभ पंतसाठी बोली लावली.

मात्र त्यांना संघात घेण्यासाठी पूर्ण जोर लावला नाही. यावरुन हे स्पष्ट होतंय, की, हे दोघेही खेळाडू त्यांना संघात हवे होते मात्र त्यांच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी द्यायची नव्हती.

केएल राहुल आणि रिषभ पंत यांचं लिलावात नाव येताच,रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सुरुवातीला चांगलाच पाठलाग केला. मात्र बोली १० कोटींच्या पुढे गेल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने माघार घेतली आणि दिल्ली, पंजाब आणि लखनऊ यांच्यात स्पर्धा रंगली.

शेवटी दिल्ली कॅपिटल्सने केएल राहुलला आपल्या संघात घेतलं. तर लखनऊ सुपरजायंट्सने रेकॉर्डब्रेक २७ कोटींची बोली लावत रिषभ पंतला आपल्या संघात स्थान दिलं.

आगामी हंगामासाठी असा आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ:

फलंदाज

विराट कोहली

रजत पाटीदार

फिल सॉल्ट (इंग्लंड)

जितेश शर्मा

देवदत्त पड्डीकल

स्वस्तिक चिकारा

ऑल राउंडर

लियम लिव्हिंगस्टोन (इंग्लंड)

टीम डेव्हिड (ऑस्ट्रेलिया)

कृणाल पांड्या

स्वप्नील सिंग

रोमारिओ शेपर्ड (वेस्ट इंडिज)

जेकब बेथोली (इंग्लंड)

मनोज भडांगे

मोहित राठी

गोलंदाज

यश दयाल

जोश हेजलवूड (ऑस्ट्रेलिया)

भुवनेश्वर कुमा

रसिख दार

सुयश शर्मा

नुवान तुषारा (श्रीलंका)

लुंगी एनगिडी (दक्षिण आफ्रिका )

अभिनंदन सिंग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT