Virat Kohli Injury Saam Tv
Sports

Virat Kohli Injury : किंग कोहलीला नेट्समध्ये गंभीर दुखापत, विराट चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलला मुकणार?

Virat Kohli Injured : टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी माहिती समोर आली आहे. भारताचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याआधी दुखापतग्रस्त झाला आहे.

Yash Shirke

Ind vs Nz Final : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्याला अवघे काही तास उरले आहेत. या सामन्यामध्ये भारत आणि न्यूझीलंड हे दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर येणार आहेत. अशातच टीम इंडिया आणि चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. सराव करत असताना विराट कोहलीला दुखापत झाली आहे. नेट्समध्ये एक चेंडू त्याच्या गुडघ्यावर येऊन जोरात आदळला.

पाकिस्तानची वेबसाईट जियो न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, सरावादरम्यान चेंडू विराट कोहलीच्या गुडघ्यावर जाऊन आदळला. दुखापतीमुळे विराटची वाईट अवस्था झाली. त्याच्या गुडघ्याला जोरदार वेदना झाल्या. दुखापत झाल्यानंतर विराट नेट्समधून बाहेर पडला, यावरुनच त्याच्या दुखापतीचा अंदाज लावू शकतो असे पाकिस्तानच्या वेबसाईटने म्हटले.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यापूर्वी विराट कोहली जखमी झाल्याने टीम इंडियाचे चाहते निराश झाले आहेत. कोहली या स्पर्धेमध्ये भारतासाठी महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. त्याच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचे टेन्शन वाढल्याचे लोक म्हणत आहेत. टीम मॅनेजमेंटने याबाबत माहिती दिली आहे. कोहलीच्या दुखापतीबाबत घाबरण्याचे काही कारण नाही, तो अंतिम सामना खेळण्यासाठी पूर्णपणे फिट आहे, असे टीम मॅनेजमेंटने म्हटले आहे.

विराट कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तुफानी खेळ केला आहे. त्याने एकूण चार सामन्यांमध्ये एक शतक आणि एक अर्धशतक यांच्या सहाय्याने तब्बल २१७ धावा केल्या आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याचा समावेश आहे. त्याचा फॉर्म अंतिम सामन्यातही राहावा अशी प्रार्थना चाहते करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

Samsung Galaxy S25 FE 5G मोबाईल लाँच, अपग्रेडेड बॅटरीसह जाणून घ्या खास फिचर्स आणि किंमत

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Almond Jaggery Puran Poli Recipe : वाटीभर बदाम अन्...; गणपतीसाठी बनवा मऊ- लुसलुशीत पुरणपोळी

SCROLL FOR NEXT