Virat Kohli ignore gautam gambhir saam tv
Sports

Virat Kohli Video : अर्रर्रर्र श्यॅsss, थेट इग्नोरच केलं; विराट कोहलीनं गौतम गंभीरकडं बघितलंच नाही, व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli vs Gautam Gambhir : दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला वनडे सामना जिंकल्यानंतर विराट कोहलीचा 'अॅटिट्यूड' बदलला आहे. ड्रेसिंग रूमकडं जाताना विराट कोहलीनं हेड कोच गौतम गंभीरकडं बघितलं सुद्धा नाही. हा व्हिडिओ आता तुफान व्हायरल होत आहे.

Nandkumar Joshi

काही वर्षांपूर्वी आयपीएलच्या एका सामन्यात विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात भरमैदानात राडा झाला होता. गौतम गंभीर तर त्यावेळी अंगावरच धावून गेला होता. तेव्हापासून या दोघांमध्ये निर्माण झालेली कटुता कितीही, कुणीही आणि काहीही म्हटलं तरी अजून संपलेली नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यानंतर ड्रेसिंग रूममधला व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. त्यात विराट कोहलीनं हेड कोच असलेल्या गौतम गंभीरला इग्नोर केलं आहे. त्याच्याकडं लक्षही दिलं नाही.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात काल, रविवारी रांचीमध्ये पहिला वनडे सामना झाला. दक्षिण आफ्रिकेने कसोटीत केलेल्या पराभवाचा वचपा भारतानं वनडेत घेतला. पहिल्याच वनडेत १७ धावांनी विजय मिळवला. तुफानी शतक झळकावणारा विराट कोहली हा सामन्याचा हिरो ठरला. पण त्याच्या कामगिरीपेक्षा त्याच्या एका कृतीचा व्हिडिओच जास्त चर्चेत आहे. सामना संपल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये जाताना त्यानं हेड कोच गौतम गंभीरला सपशेल टाळलं. त्याच्याकडं साधं बघितलंही नाही. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गौतम-विराट वादाबाबत 'गंभीर' चर्चा सुरू झाली आहे.

विराट कोहलीनं या सामन्यात १२० चेंडूंत १३५ धावा कुटल्या. विराट प्लेअर ऑफ द मॅच ठरला. कधी नव्हे तो विराट इतका आक्रमक दिसला. या खेळीत त्यानं खणखणीत सात षटकार ठोकले होते. असा आक्रमक बाणा त्याच्या अख्ख्या वनडे कारकिर्दीत दुसऱ्यांदाच बघायला मिळाला. त्याचबरोबर त्यानं ११ सणसणीत चौकारही मारले. विराटसह रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या अर्धशतकी खेळीमुळं भारताला दक्षिण आफ्रिकेसमोर तगडं आव्हान ठेवता आलं. कोहली बाद झाल्यानंतर एक क्लिप व्हायरल झाली. त्यात गौतम गंभीर आणि विराट कोहली एकमेकांना अलिंगन देताना दिसत आहेत. त्याचे फोटोही एक्सवर व्हायरल झाले आहेत.

विराट कोहलीनं खरंच गौतम गंभीरला इग्नोर केलं?

विराट कोहली आणि गौतम गंभीरचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याची जोरदार चर्चा देखील सुरू आहे. कोहली हा सामना संपल्यानंतर ड्रेसिंग रूमच्या दिशेने जात असताना या क्लिपमध्ये दिसतोय. गंभीर दरवाजाजवळ उभा होता. गंभीरनं विराटकडे पाहिलं. पण विराटनं गंभीरकडं लक्षही दिलं नाही. तो फोनवर बोलत थेट आतल्या रूममध्ये निघून गेला.

कोहली सध्या फक्त वनडे फॉरमॅटमध्ये खेळतो. त्यानं टी २० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. २०२७ च्या वर्ल्डकपसाठी भारतीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन्ही दिग्गज खेळाडू नसतील, अशी चर्चा सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहली बरेच महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात वनडे मालिका झाली होती. या काळात कोहली आणि गंभीर हे एकमेकांशी संवाद साधताना किंवा चर्चा करताना कुठेही एकत्र दिसले नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काय डोंगर, काय झाडी, आता शहाजीबापूंवर धाडी,भाजपनं आवळला शिंदेसेनेभोवतीचा फास

नगरपरिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्या, कार्यकर्त्यांच्या आशेवर फेरलं पाणी

Tuesday Horoscope : गोडधोड खाण्याचे योग, धनलाभ होणार; ५ राशींच्या आयुष्यात गोडवा वाढणार

Maharashtra Politics : अजित पवार पुढच्या काळात मुख्यमंत्री असतील; मिटकरींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Politics: नाशिकचा पालकमंत्री ठरला? अजित पवारांनी स्वतःच नाव जाहीर केलं

SCROLL FOR NEXT