virat kohli yandex
क्रीडा

Virat Kohli Record: विराट कोहली इतिहास रचणार! पहिल्याच कसोटीत दिग्गजांना मागे सोडणार

IND vs BAN, Virat Kohli Record: भारत आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघातील स्टार फलंदाज विराटला मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे.

Ankush Dhavre

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना १९ सप्टेंबरपासून चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे.

गेले काही महिने कसोटी क्रिकेटपासून दूर असलेला विराट कोहली या मालिकेतून कमबॅक करताना दिसून येणार आहे. दरम्यान पहिल्याच सामन्यात त्याला एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे. काय आहे रेकॉर्ड? जाणून घ्या.

विराट कोहली हा तिन्ही फॉरमॅटमधील प्रमुख फलंदाज आहे. वनडे, टी -२० क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर विराट आता कसोटी क्रिकेटमध्ये आपला जलवा दाखवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. विराटने पहिल्या सामन्यात जर १५२ धावा केल्या, तर कसोटी क्रिकेटमध्ये तो ९००० धावा पूर्ण करेल. यासह कसोटी क्रिकेटमध्ये ९००० धावांचा पल्ला गाठणारा तो भारताचा चौथा फलंदाज ठरेल. तर वर्तमान क्रिकेटमधील तिसरा फलंदाज ठरेल.

विराट इतिहास रचणार!

विराटला कसोटीत इतिहास रचण्यासाठी अवघ्या १५२ धावा करायच्या आहेत. यासह त्याला कसोटीत ९००० धावांचा टप्पा गाठण्याची संधी असणार आहे. भारतीय क्रिकेटमध्ये पाहिलं तर , सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुनील गावसकर यांना हा कारनामा करता आला आहे. आता विराट असा रेकॉर्ड करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरणार आहे. हा कारनामा विरेंद्र सेहवाग आणि सौरव गांगुली यांना देखील करता आलेला नाही.

वर्तमान क्रिकेटमध्ये ९००० धावांचा पल्ला गाठणारा तो तिसरा फलंदाज ठरणार आहे. याआधी जो रूटने १२,४०२ तर स्टीव्ह स्मिथच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये ९००० पेक्षा अधिक धावा करण्याची नोंद आहे.

तर भारतीय फलंदाजांबद्दल बोलायचं झालं, तर या यादीत भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या यादीत सर्वाच्च स्थानी आहे. सचिनच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये १५,९२१ धावा करण्याची नोंद आहे. तर राहुल द्रविडने १३,२८८ धावा केल्या आहेत. या यादीत तिसऱ्या स्थानी असलेल्या सुनील गावसकर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये १०,१२२ धावा केल्या आहेत. तर विराटने आतापर्यंत ८,८४८ धावा केल्या आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

सचिन तेंडुलकर - १५९२१ धावा

राहुल द्रविड -१३२८८ धावा

सुनील गावसकर- १०१२२ धावा

विराट कोहली - ८८४८ धावा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: ज्याला पाडायचे त्याला पाडा - मनोज जरांगे

Sunday: रविवारी करा 'या' वस्तूची खरेदी

Aishwarya-Avinash Narkar: दाक्षिणात्य गाण्यावर थिरकले नारकर कपल; लेक अन् जावयाचा भन्नाट डान्स पाहून वडिलांच्या चेहऱ्यावर आले हसू, पाहा VIDEO

Bengaluru School: खेळताना अंगावर पानी पडले, संतापलेल्या मॅडमने काठीने मारलं, पोराचे दात तुटले; गुन्हा दाखल!

Manoj Jarange : संभ्रम नकोच! ज्याला पाडायचं त्याला पाडा अन्..., मनोज जरांगेंचा एल्गार, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT