virat kohli sachin tendulkar yandex
Sports

Virat Kohli Record: विराटच्या रडारवर मास्टर ब्लास्टरचा महारेकॉर्ड! तिसऱ्या सामन्यात रचणार इतिहास?

Virat Kohli Can Break Sachin Tendulkar Record: भारतीय संघातील अनुभवी फलंदाज विराट कोहलीला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडण्याची संधी असणार आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघातील अनुभवी फलंदाज विराट कोहली हा वनडे क्रिकेटमधील स्टार फलंदाज आहे. वनडे क्रिकेटमध्ये त्याचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. आतापर्यंत खेळलेल्या २९४ सामन्यांमध्ये त्याने १३८८६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ५० शतकं झळकावली आहेत. यासह ७२ अर्धशतकं झळकावली आहेत.

वनडेत शानदार रेकॉर्ड राहिला असला तरीदेखील विराट कोहलीला श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या सुरुवातीच्या दोन्ही वनडेत त्याला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये तो स्वस्तात माघारी परतला आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात तो जेफ्री वँडर्सेच्या जाळ्यात अडकला आणि अवघ्या १४ धावा करत माघारी परतला. दरम्यान सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये स्वस्तात माघारी परतल्यानंतर तिसऱ्या सामन्यात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. या सामन्यात त्याला भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडून काढण्याची संधी असणार आहे.

२७००० धावा पूर्ण करण्याची संधी

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा वनडे सामना ७ ऑगस्ट रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यात अवघ्या ७८ धावा पूर्ण करताच तो सचिन तेंडुलकरला मागे सोडणार आहे. या सामन्यात ७८ धावा पूर्ण करताच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७००० धावा पूर्ण करणार आहे.

केवळ ३ फलंदाजांना जमलाय हा कारनामा

विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्या निवडक खेळाडूंपैकी एक आहे, ज्याच्या नावे अनेक मोठ मोठ्या विक्रमांची नोंद आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ ३ असे फलंदाज आहेत ज्यांना २७००० धावा करता आल्या आहेत. ज्यात भारताकडून सचिन तेंडुलकर, ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग आणि श्रीलंकेच्या कुमार संगकाराचासम समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस उलटली, विद्यार्थी जखमी

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

SCROLL FOR NEXT