virat kohli twitter
Sports

Virat Kohli: काय होतास तू.. काय झालास तू, 2012 नंतर पहिल्यांदाच विराटसोबत असं घडलं

Virat Kohli ICC Test Ranking: आयसीसीने कसोटी फलंदाजांची यादी जाहीर केली आहे. या यादीत भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीला मोठा फटका बसला आहे.

Ankush Dhavre

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याने असंख्य रेकॉर्ड मोडून काढले आहेत.मात्र गेल्या काही महिन्यांपासून तो सातत्याने चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरतोय. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत फ्लॉप ठरल्यानंतर, बॉर्डर-गावसकर मालिकेतही त्याची बॅट शांतच राहिली.

या संपूर्ण मालिकेत तो ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंवर बाद होत राहिला. मालिकेतील पहिल्याच सामन्यात त्याने शतकी खेळी केली. त्यानंतर त्याला अर्धशतकी खेळीही करता आली नाही. या मालिकेतील ९ डावात त्याला अवघ्या १९० धावा करता आल्या.

हा विराटचा ऑस्ट्रेलियात खेळताना सर्वात खराब रेकॉर्ड आहे. दरम्यान या कामगिरीचा फटका त्याला आयसीसीच्या रँकिंगमध्येही बसला आहे. एकेकाळी नंबर १ वर टिकून असणारा विराट आता पहिल्यांदाच टॉप २५ मधून बाहेर पडला आहे.

२०१२ नंतर पहिल्यांदाच असं घडलं

केवळ वनडे, टी-२० त नव्हे, तर विराट कोहली कसोटीतील देखील दिग्गज फलंदाज आहे. मात्र त्याची बॅट गेल्या काही महिन्यांपासून शांत आहे. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या मालिकेतही तो संघर्ष करताना दिसून आला होता. काही दिवसांपूर्वी झालेल्या बॉर्डर- गावसकर मालिकेतही विराटला बाद करण्यासाठी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी चांगलाच प्लान आखला.

ऑफ साईडच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर विराट बाद होऊन माघारी परतला. मालिकेतील शेवटचा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात विराटला १७ आणि ६ धावांची खेळी करता आली. हा सामना झाल्यानंतर ८ जानेवारीला आयसीसीने कसोटी फलंदाजांची रँकिग जाहीर केली.

या रँकिंगमध्ये विराटला ३ स्थानांचा फटका बसला आहे. त्यामुळे तो आता टॉप २५ मधून बाहेर पडला आहे. त्याची रेटींग ६१४ इतकी आहे. विराटवर गेल्या १२ वर्षात टॉप २५ मधून बाहेर पडण्याची वेळ कधीच आली नव्हती.

पहिल्यांदाच तो टॉप २५ फलंदाजांच्या यादीतून बाहेर पडला आहे. कोहलीने २०१८ मध्ये आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकींगची मिळवली होती. अव्वल स्थानी पोहोचलेल्या विराटची कसोटी रँकिंग ९१८ वर जाऊन पोहोचली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

SCROLL FOR NEXT