Sakshi Sunil Jadhav
१९ फेब्रुवारीला महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने लोक शिवजयंती साजरी करतात.
शिवजंयतीच्या दिवशी खास परंपरेनुसार महाराजांच्या काळातील काही गोड पदार्थ केले जातात. त्यातील एक म्हणजे सांजांची पोळी.
सांजाची पोळीही चवीला गोड आणि एकदम मऊसुत असते. चला जाणून घेऊयात साहित्य आणि कृती.
गव्हाचं पीठ, मीठ, तूप, रवा, गूळ, पाणी, वेलची पूड, जायफळ इ.
गव्हाचे पीठ व्यवस्थित चाळून मळून घ्या. ते साधारण १५ ते २० मिनिटं तसेच ठेवा. त्यात तेला ऐवजी तुपाचा वापर करा.
आता एका कढईत पाणी घ्या. ते गरम झाल्यावर त्यात गुळाचे तुकडे टाकून तो वितळवा.
आता पाण्यामध्ये चमचाभर तूप, वेलची आणि जायफळ किसून मिक्स करुन घ्या. तुम्ही जायफळची वापडर चवीपुरती वापरु शकता.
आता एका कढईत रवा छान रंग बदलेपर्यंत भाजून घ्या. त्यात गुळाचं पाणी मिक्स करा आणि शिऱ्यासारखं त्याला चिकटसर होईपर्यंत परता.
आता रवा थंड झाला की त्याचे गोळे तयार करा. मग मळलेल्या कणकेचे पुरणपोळी करतो त्याप्रमाणे लाटून हे गोळे त्यात ठेवा.
आता पुरणाच्या पोळीसारखं लाटा. तव्यावर तूपाचा वापर करुन भाजून घ्या आणि शिवकालीन प्रसिद्ध मराठमोळी सांजोळी पोळी सर्व्ह करा.