Virat Kohli Retirement : विराट कोहली इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती घेणार? काय सांगतो अहवाल? वाचा

Virat Kohli : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये विराट कोहलीला चांगला खेळ करता आला नाही. पहिल्या कसोटी सामन्यात त्याने शतक ठोकले. पण त्यानंतर त्याला चांगला फॉर्म टिकवता आला नाही.
Virat Kohli Retirement
Virat Kohli Retirement Saam Tv
Published On

Virat Kohli Retirement : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या सामन्यामध्ये रोहित शर्माने निवृत्ती घेणार नसल्याची अधिकृत घोषणा केली. या कसोटी सामन्यांमध्ये खराब फॉर्ममुळे तो निवृत्ती घेईल असे काहींचे मत होते. कसोटी मालिकेमध्ये वाईट कामगिरीनंतर विराट कोहलीच्या निवृत्तीबाबतही अफवा उडत होत्या. विराटने या अफवा खोट्या ठरवल्या आहेत. विराटचा सध्यातरी निवृत्ती घेण्याचा विचार नसून तो पुढच्या विश्वचषकासाठी तयारी करत आहे अशी माहिती समोर आली आहे.

पीटीआयने दिलेल्या अहवालानुसार, विराट कोहलीच्या मनात निवृत्तीचा विचार नाही. तो सध्या निवृत्तीच्या मूडमध्ये नाही. आफ्रिकेमध्ये होणाऱ्या २०२७ विश्वचषक खेळण्याचे त्याचे ध्येय आहे. विराटने मागच्या वर्षी टी-२० मधून निवृत्ती घेतली होती. तरी विराटने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यासंबंधित कोणतेही विधान केलेले नाही.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये, ५ कसोटी मालिकेमध्ये विराटचा खेळ चांगला नव्हता. तो तब्बल आठ वेळा ऑफ-स्टंपच्या बाहेरच्या चेंडू खेळताना बाद झाला. मालिकेमध्ये २३.७५ च्या सरासरीने नऊ डावांमध्ये त्याने १९० धावा केल्या. पर्थमध्ये दुसऱ्या डावात केलेले शतक सोडून त्याला एकाही डावात धावा करता आल्या नाही.

Virat Kohli Retirement
WTC Final Scenario: भारतीय संघ अजूनही WTC Final मध्ये प्रवेश करु शकतो? वाचा कसं असेल समीकरण

विराट कोहलीच्या तुलनेमध्ये रोहित शर्माने अधिक खराब कामगिरी केली. त्याने एकूण सहा डावांमध्ये फक्त ३१ धावा केल्या. फॉर्म चांगला नसल्याने त्याने शेवटचा कसोटी सामनाही खेळला नाही. भारतीय संघ पाच महिन्यांनंतर इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. खराब फॉर्ममुळे या दोन्ही खेळाडूंपैकी एकाची संघात निवड केली जाऊ शकते, असे माजी निवडकर्त्याने पीटीआयला सांगितले आहे. दरम्यान भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरने या दोन्ही दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीचा निर्णय त्यांनी स्वत:हून घ्यावा असे म्हटले आहे.

Virat Kohli Retirement
IND vs AUS, 2024-25: बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com