भारत- पाकिस्तान सामना हा महायुद्धापेक्षा कमी नसतो. जेव्हा जेव्हा हे दोन्ही संघ आमने सामने येतात तेव्हा क्रिकेट चाहत्यांना पैसावसूल सामना पाहायला मिळत असतो. पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपते.
आता हे दोन्ही संघ आशिया चषकात आमने सामने येणार आहेत. या सामन्यातही विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.
विराटने २०२२ टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली होती.
आशिया चषक २०२३ स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना श्रीलंकेच्या कँडीमध्ये रंगणार आहे. या सामन्याच्या १ दिवसापूर्वी भारत आणि पाकिस्तानातील खेळाडू एकत्र सराव करण्यासाठी मैदानात उतरले होते.
या सराव सत्रादरम्यान विराट कोहली आणि हारिस रउफ आमने सामने आले होते. जेव्हा दोन्ही संघातील खेळाडू सराव करत होते त्यावेळी विराट कोहली आणि हारिस रउफने एकमेकांकडे पाहिलं.
दोघांची नजर एक होताच, दोघे एकमेकांना भेटण्यासाठी पुढे आले. कोहलीला येताना पाहून हारिस रउफने म्हटले की, मा जिथे जिथे जातो, लोकं कोहली कोहली असं ओरडतात.हे ऐकून विराटलाही हसू आवरलं नाही. त्यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारली.
काय घडलं होतं?
ज्यांनी हा सामना पाहिला असेल त्यांना या सामन्यात काय घडलं होतं हे चांगल्याने माहित असेल. गतवर्षी झालेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारत- पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.
या सामन्यातील १९ व्या षटकात हारिस रउफ गोलंदाजी करण्यासाठी आला होता. या षटकातील पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर विराटने सलग २ षटकार मारून भारतीय संघाला या सामन्यात कमबॅक करून दिले होते. (Latest sports updates)
भारत- पाकिस्तानच्या खेळाडूंची भेट..
केवळ विराट कोहली आणि हारिस रउफ यांनीच नव्हे तर इतर खेळाडूंनी देखील एकमेकांची भेट घेतली. सराव सत्र संपल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि इमाम उल हकची भेट घेतली.
बाबर आझम आणि इमामला भेटल्यानंतर, 'वहिनी आणि मुलगी कशी आहे..?' तर या प्रश्नाचे उत्तर देताना कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की,'ते आशिया चषकासाठी इथे येऊ शकलेले नाहीत.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.