Virat kohli Saam tv
Sports

IND VS AUS: विराट सलग पाचव्यांदा ठरला फेल .. ऑस्ट्रेलियाच्या २ नवख्या खेळाडूंनी मिळून केला विराटचा 'गेम'

बॉर्डर गावसकर ट्रॉफीत भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीला हवी तशी कामगिरी करता आली नाहीये

Ankush Dhavre

Ind vs Aus Virat kohli's form: बॉर्डर गावसकर ट्रॉफीत भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीला हवी तशी कामगिरी करता आली नाहीये. इंदूरच्या मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावात तो फ्लॉप ठरला आहे.

या सामन्यातील दुसऱ्या डावात तो अवघ्या १३ तर पहिल्या डावात २२ धावा करत माघारी परतला होता. ऑस्ट्रेलियाचे २ नवखे गोलंदाज विराट कोहलीला सुरुवातीपासून नडत आहे. (Latest Sports Updates)

ऑस्ट्रेलिया संघाकडून या मालिकेत २ गोलंदाज आहेत जे जोरदार कामगिरी करत आहेत. हे दोन गोलंदाज आहेत टॉड मर्फी आणि कुन्हेमन. विराट ज्या ज्यावेळी फलंदाजीला येतोय त्यावेळी हे दोन्ही गोलंदाज त्याला नडताय.

तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात विराट चांगल्या टचमध्ये दिसून येत होता. त्याने कुन्हेमनला २ चौकार मारले. मात्र त्यानंतर तो पायचीत होऊन माघारी परतला. कुन्हेमनने टाकलेल्या चेंडूवर विराटने चुकीचा शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र या नादात तो बाद होऊन माघारी परतला.

नवखे खेळाडू विराटसाठी ठरताय डोकेदुखी...

विराट कोहली या सामन्यातील पहिल्या डावात २२ धावांवर माघारी परतला होता. पहिल्या डावात त्याने मर्फीने माघारी धाडले होते. तर दुसऱ्या डावात अवघ्या १३ धावसंख्येवर त्याला कुन्हेमनने बाद करत माघारी धाडले होते. या दोघांनाही जास्त सामने खेळण्याचा अनुभव नाहीये. दोघांची ही पहिलीच कसोटी मालिका आहे.

विराट कोहलीने इंदूर कसोटी सामन्यापूर्वी ३ इनिंगमध्ये ७५ धावा केल्या होत्या. यादरम्यान तो ३ वेळेस बाद होऊन माघारी परतला होता. ज्यात २ वेळेस टॉड मर्फीने तर १ वेळेस त्याला कुन्हेमनने बाद करत माघारी धाडले होते.

५ इनिंगमध्ये केल्या आहेत केवळ ११० धावा..

विराट कोहलीने या इनिंगमध्ये केवळ ११० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाहीये. तर त्याची सरासरी २५ पेक्षाही कमी आहे. विराट या संपूर्ण मालिकेत फिरकी गोलंदाजांविरुध्द खेळताना अडचणींचा सामना करताना दिसून आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात जिम ट्रेनर लेडीने लोखंडी रॉडने मारहाण करून केला तरुणाचा खून

Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी; मनोरंजन विश्वावर शोककळा

Typhoid: टायफॉइडची सुरुवातीची लक्षणे कोणती? वेळीच घ्या काळजी

Bhaskar Jadhav : भास्कर जाधवांनी पुन्हा ब्राह्मण समाजाला डिवचलं; व्हॉट्सअॅप स्टेटसवर पेशव्यांचा इतिहास काढला, VIDEO

Rahul Gandhi: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', व्हिडिओ पोस्ट करत लगावला निवडणूक आयोगाला टोला| Video Viral

SCROLL FOR NEXT