Virat kohli viral video  twitter
Sports

Virat Kohli Viral Video: मॅन ऑफ द मॅच केएल राहुल,मग विराटला गोल्ड मेडल का ?

India vs Australia: या सामन्यानंतर विराट कोहलीला खास मेडल देण्यात आलंय.

Ankush Dhavre

Virat Kohli Viral Video:

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील भारतीय संघाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरूद्ध पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने विजयासाठी २०० धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला हवी तशी सुरूवात करता आली नव्हती. रोहित शर्मा, ईशान किशन आणि श्रेयस अय्यर स्वस्तात बाद झाले. त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुलने मिळून १५० पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली आणि संघाला विजय मिळवून दिला.

हा सामना झाल्यानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. या सामन्यात दमदार फलंदाजी करण्यासह अप्रतिम क्षेत्ररक्षण केल्यामुळे विराट कोहलीला मेडल देण्यात आलं आहे.

हा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, विराट कोहलीने मेडलचा स्वीकार करतो आणि मेडल तोंडात ठेऊन पोझ देताना दिसून येतो.

विराटने या सामन्यात अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं. त्याने सामन्याच्या सुरूवातीलाच मिचेल मार्शचा भन्नाट झेल टिपला. त्यानंतर त्याने क्षेत्ररक्षण करताना बऱ्याच धावा वाचवल्या. (Latest sports updates)

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, प्रथम फलंदाजी करत असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचा डाव अवघ्या १९९ धावांवर संपुष्टात आला होता. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून विराट कोहलीने ८५ तर केएल राहुलने नाबाद ९७ धावांची खेळी करून संघाला ६ गडी राखून विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भारतीय गुप्तचर विभागातील अधिकारी असल्याचा दाख दाखवून तब्बल 18 कोटी 50 लाखांचा गंडा

Unique Fort : एका बाजूला डोंगर, तीन बाजूंनी पाणी! दोन नद्यांच्या संगमावर उभा आहे 'हा' अद्भुत किल्ला

दिवाळीच्या सणावर काळाचा घाला! धाराशिवमध्ये भीषण आगीत संपूर्ण कुटुंब जळून खाक, ६ जणांचा होरपळून मृत्यू

Oil Price Crash : कच्च्या तेलाचे दर घसरले, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार की महागणार? जाणून घ्या

सकाळ सकाळ मुंबईकरांचे हाल, फटाक्यामुळे रेल्वे सिग्नलला आग; पश्चिम रेल्वे ३५ मिनिटे उशिराने

SCROLL FOR NEXT