virat kohli gautam gambhir twitter
Sports

IPL Controversies: विराट- गंभीर वाद ते स्पॉट फिक्सिंग'; हे आहेत आयपीएल स्पर्धेतील गाजलेले वाद

Top Controversies In IPL: आयपीएल स्पर्धा लवकरच सुरु होणार आहे. दरम्यान ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी जाणून घ्या या स्पर्धेतील गाजलेले वाद.

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेला येत्या २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. तर स्पर्धेतील फायनलचा सामना २५ मे रोजी खेळला जाणार आहे. स्पर्धेची सुरुवात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणाऱ्या सामन्याने होणार आहे. दरम्यान या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी जाणून घ्या या स्पर्धेतील गाजलेले ५ वाद.

हरभजन सिंग- श्रीसंथ वाद

आयपीएल २००८ स्पर्धेत हरभजन सिंग आणि एस श्रीसंथ यांच्यातील वादामुळे चर्चेत आली होती. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये रंगला होता. या सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर श्रीसंथ हरभजनला हार्डलक असे म्हटले होते. हे ऐकताच श्रीसंथला राग अनावर झाला आणि त्याने श्रीसंथला कानाखाली मारली होती.

रविंद्र जडेजावर १ वर्षांचा बॅन

रविंद्र जडेजा सुरुवातीला राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळायचा. त्यावेळी त्याला मुंबई इंडियन्स संघाकडून ऑफर आली होती. त्यावेळी जडेजाने आपल्या फ्रेंचायझीला न कळू देता, मुंबई इंडियन्ससोबच डिल करण्याचा प्रयत्न केला होता. हे आयपीएलच्या नियमांच्या विरुद्ध आहे. त्यामुळे त्याच्यावर १ वर्षांची बंदी घातली गेली होती.

फिक्सिंगमध्ये अडकले ३ खेळाडू

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त घटना म्हणजे, स्पॉट फिक्सिंग. या फिक्सिंगमध्ये राजस्थान रॉयल्स संघातील ३ खेळाडू अडकले होते. ज्यात अंकित चव्हाण, अजित चंदीला आणि एस श्रीसंत यांचा समावेश होता.

कोहली- गंभीर वाद

आयपीएल २०२३ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स आणि लखनऊ सुपर जांयट्स यांच्यात झालेल्या सामन्यात विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते. या वादात शेवटी गंभीरनेही उडी घेतली होती.

स्पर्धेच्या फाऊंडरला केलं बाहेर

आयपीएल स्पर्धेची सुरुवात ललित मोदी यांनी केली होती. ही स्पर्धा सुरु करण्यासाठी त्यांनी पूर्ण जोर लावला होता. मात्र त्यानंतर ललित मोदींवर पैशांचा घोटाळा केल्याचे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना लीगमधून बाहेर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC Protest: मोठी बातमी! सरकारच्या जीआरविरोधात न्यायालयात जाणार, छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांमध्ये चर्चा सुरू

Actress : ...मारा, तिचे कपडे काढा, अफेयरच्या अफवांवरुन छळ, मराठी अभिनेत्रीने सांगितला भयानक अनुभव

Manoj jarange patil protest Live: - सरकारच्या जीआर विरोधात ओबीसी नेते न्यायालयात धाव घेणार

Gunratan Sadavarte: मोठी बातमी! सरकारच्या निर्णयावर आक्षेप, गुणरत्न सदावर्ते कोर्टात जाणार

Manoj Jarange: रक्ताने रंगवलेलं पिंपळपान: मनोज जरांगे आणि छत्रपती शिवाजी महाराज एकाच चित्रात|VIDEO

SCROLL FOR NEXT