virat kohli twitter
Sports

Virat Kohli Viral Video: महाकुंभ मेळ्यात विराटच्या फॅनची खास डिमांड, Video तुफान व्हायरल

Virat Kohli Fan Viral Video: प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा सुरु आहे. या मेळ्याला हजेरी लावलेल्या एका फॅनने विराट कोहलीकडे खास डिमांड केली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या धावा करण्यात संघर्ष करताना दिसतोय. आधी न्यूझीलंडविरुद्ध आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत. त्यामुळे त्याला प्लेइंग ११ मधून बाहेर करण्याची मागणी जोर धरू लागली होती. मात्र काही फॅन्सला अजूनही आस आहे की, विराट दमदार कमबॅक करेल. दरम्यान प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महकुंभ मेळ्यातील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात एका फॅनने विराटकडे खास मागणी केली आहे.

व्हिडिओ होतोय व्हायरल

विराट कोहली आणि थेट युएईमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळण्यासाठी उतरणार आहे. या स्पर्धेत त्याने कमीत कमी ५ ते ६ शतक झळकवावे अशी इच्छा एका फॅनने व्यक्त केली आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत, यासह विराटच्या फॅन्सलाही आस आहे की, विराट शतक झळकावत दमदार कमबॅक करेल. या स्पर्धेसाठी आज भारतीय संघाची घोषणा होणार आहे. या संघात विराट कोहलीला स्थान मिळेल. मात्र त्याची कामगिरी कशी असेल हे पाहणं महत्वाचं ठरेल.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानात केले जाणार असले तरीदेखील भारताचे सामने यूएईत होणार आहेत. या स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. तर भारतीय संघाचा पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध होणार आहे.

तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा हाय व्होल्टेज सामना २३ फेब्रुवारीला होणार आहे. त्यानंतर पुढील सामना २ मार्चला न्यूझीलंडविरुद्ध होईल. या स्पर्धेसाठी विराट कोहलीला स्थान दिले जाऊ शकते. दरम्यान या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. विराट कोहलीच्या मानेला दुखापत झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nepal Prime Minister K.P. Sharma Oli resigns : नेपाळमध्ये सत्तापालट; पंतप्रधान ओलींचा राजीनामा

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूरात राज्यस्तरीय एकदिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन

RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; ऑफिसर पदासाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Koli Community : कोळी समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करा; महादेव, मल्हार कोळी समाज आक्रमक

गोकुळचा मोठा निर्णय! लवकरच चीज अन् आईस्क्रीम बाजारात आणणार; शेतकऱ्यांनाही दिलासा

SCROLL FOR NEXT