Virat Kohli fielding on ground  saam tv
क्रीडा

Virat Kohli: विराट कोहलीवर आरोप करणं बांगलादेशच्या अंगलट येणार? फेक फिल्डिंगचा नियम काय सांगतो?

बांगलादेशचा विकेटकीपर नुरुल हसनने विराट कोहलीवर आरोप केला आहे.

नरेश शेंडे

नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेश यांच्यात काल बुधवारी अॅडलेडच्या मैदानात श्वास रोखून धरणारा सामना झाला. या सामन्यात भारतानं बांगलादेशला पाच धावांनी पराभूत केलं. परंतु, या सामन्यात आरोपांच्या फैरीही झडताना दिसल्या. बांगलादेशचा विकेटकीपर (Nurul Hasan) नुरुल हसनने विराट कोहलीवर आरोप केला आहे.

विराटने सामन्यादरम्यान फसवणूक केली आणि आमच्या संघाला गोंधळात पाडलं, असा आरोप हसनने केला आहे. विराटवर (Virat kohli) बांगलादेशनं आरोप केल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मात्र, आयसीसीच्या नियमानुसार, विराटवर आरोप करणारा बांगलादेशचा संघ स्वत:च या प्रकरणात अडकणार असल्याची शक्यता आहे. (Bangladesh team allegations on virat kohli over fake fielding issue)

आयसीसीचा नियम काय सांगतो?

आयसीसीच्या खेळांच्या अटींच्या नियम 41.5 नुसार फिल्डिंग करणारी टीम फलंदाजाला विनाकारण त्रास देऊ शकत नाही. तसंच फंलदाजाला गोंधळात टाकू शकत नाही. जर अंपायरला असं वाटलं, की एखाद्या खेळाडूनं नियम मोडला आहे, त्यावेळी डेड बॉल घोषीत करून पेनल्टीचे पाच रन देऊ शकतात. शंटो आणि लिटनने कोहलीकडे पाहिलं पण नव्हतं.त्यामुळे त्यांचं लक्ष विचलीत होण्याच प्रश्नच उद्भवत नाही.

अशा परिस्थितीत नियम सांगतो की, सामन्यातील अधिकाऱ्यांवर पुराव्याशिवाय आरोप करणाऱ्या खेळाडूंवर आयसीसीकडून कारवाई केली जाऊ शकते.त्यामुळे विराट कोहलीवर आरोप करणारा नुरुल हसन स्वत:च अडचणीत सापडू शकतो. कारण विराटने केलेल्या फेक फिल्डिंगवर पंचांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप हसनने केला होता. 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लॅबुशेनवर फेक फिल्डिंग केल्यामुळं पेनल्टी लावण्यात आली होती. मार्नसने एका सामन्यात मिड ऑफवर उभं राहून थ्रो करण्याची अॅक्टिंग केली होती, पण चेंडू त्यांच्या हातात नव्हता.

सातव्या षटकात काय झालं?

बांगलादेशचा संघ फलंदाजी करत असताना सातव्या षटकात लिटन दास आणि नजमुल हुसैन फलंदाजी करत होता. बांगलादेशच्या फलंदाजाने जेव्हा फटका मारला तेव्ही अर्शदीप सिंगने डीप वरून चेंडू फेकला. पॉईंटवर असलेल्या विराटने त्या चेंडूला पकडून रिले थ्रो सारखं दुसऱ्या एंडला फेकण्याचा अॅक्शन केला, असं बांगलादेशचा विकेटकीपर नुरलचं म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT