Virat kohli  Saam TV
Sports

Virat kohli: शतक एक विक्रम अनेक! शतक झळकावताच विराटने मोठ्या विक्रमाच्या यादीत केली दिग्गज खेळाडूची बरोबरी

या शतकी खेळीसह त्याने ऑस्ट्रेलिया संघाविरुध्द खेळताना एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

Ankush Dhavre

Ind vs Aus 4th test virat kohli century: अहमदाबाद कसोटीत भारतीय संघातील फलंदाजांनी जोरदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले आहे. या डावात विराट कोहलीने जोरदार शतक झळकावले आहेत.

चौथ्या दिवशी विराटने कसोटीतील २८ वे शतक झळकावले आहे. या शतकी खेळीसह त्याने ऑस्ट्रेलिया संघाविरुध्द खेळताना एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. ( Latest sports updates)

या दिग्गज खेळाडूची केली बरोबरी..

विराटने आपल्या कारकिर्दीतील २८ वे शतक झळकावताच एक मोठ्या विक्रम आपल्या नावे केला आहे. कोहलीचे हे ऑस्ट्रेलिया संघाविरुध्द खेळताना ८ वे शतक आहे. यासह त्याने माजी भारतीय फलंदाज सुनोल गावसकरांची बरोबरी केली आहे. सुनील गावसकरांनी देखील ऑस्ट्रेलिया संघाविरुध्द खेळताना ८ शतक झळकावले होते.

ऑस्ट्रेलिया संघाविरुध्द खेळताना सुनील गावसकर आणि विराटची कामगिरी..

सुनील गावसकर: २० सामने, ८ शतक,४ अर्धशतक,१५५० धावा

विराट कोहली : २० सामने, ८ शतक, ५ अर्धशतक, १६८२ धावा

विराटने २०१९ मध्ये झळकावले होते शेवटचे शतक..

गेल्या ४ वर्षांपासून विराट कोहली शतक झळकावण्याची वाट पाहत होता . ही प्रतीक्षा आता संपली आहे. त्याने २०१९ मध्ये बांगलादेश विरुध्द झालेल्या सामन्यात १३६ धावांची खेळी केली होती.

ही त्याची शेवटची शतकी खेळी ठरली होती. त्यानंतर ४ वर्ष तो कसोटी क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावू शकला नव्हता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure Foods: ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे 5 पदार्थ जरूर खा, हार्ट देखील राहिल हेल्दी

Fake Baba: दारू सोडायला गेला, बाबाने धू धू धुतलं; VIDEO व्हायरल

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

SCROLL FOR NEXT