virat kohli saam tv
Sports

Virat Kohli Weankess: वो प्यार ही क्या जो दर्द ना दे.. विराट आपला फेव्हरेट शॉट खेळताना किती वेळा आऊट झालाय? पाहा Timeline

Virat Kohli Dismissals On Cover Drive: कव्हर ड्राईव्ह हा विराट कोहलीचा आवडता शॉट आहे. मात्र हाच शॉट खेळताना तो बऱ्याचदा बाद झाला आहे.

Ankush Dhavre

विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. असे असंख्य रेकॉर्ड आहेत,जे विराटने मोडून काढले आहेत. तर त्याने बनवलेले काही रेकॉर्ड असेही आहेत, ज्याच्या जवळपास पोहोचणंही कठीण आहे.

रोहित शर्मा म्हटलं, तर पुल शॉट आठवतो. सचिन तेंडुलकर म्हटलं, तर स्ट्रेट ड्राईव्ह आठवते. कव्हर ड्राईव्ह म्हटलं, तर सर्वांनाच विराट कोहली आठवतो. हा शॉट सर्वच फलंदाज खेळतात, मात्र विराटची बातच काही और आहे.

विराट जेव्हा कव्हर ड्राईव्ह मारतो, तेव्हा गोलंदाजही अवाक होऊन पाहत बसतो. मात्र हाच शॉट आता त्याच्यासाठी धोकादायक ठरतोय. बॉर्डर- गावसकर मालिकेत तो कव्हर ड्राईव्ह खेळताना बाद झाला आहे.

पहिला कसोटी सामना

पर्थ कसोटीतील पहिल्या डावात विराट कोहली १२ चेंडू खेळून ५ धावांवर बाद झाला होता. हेझलवूडने टाकलेल्या चेंडूवर विराटने कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू विराटच्या बॅटचा कडा घेऊन स्लिपमध्ये असलेल्या उस्मान ख्वाजाच्या हातात गेला होता.

दुसरा कसोटी सामना, पहिला डाव

मालिकेतील दुसरा कसोटी सामना अॅडलेडच्या मैदानावर पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात विराट ७ धावांवर माघारी परतला. स्टार्कने टाकलेला चेंडू दुसऱ्या स्लिपमध्ये असलेल्या स्मिथच्या हातात गेला होता.

दुसरा कसोटी, दुसरा डाव

या सामन्यातील दुसऱ्या डावात विराट, पाचव्या स्टम्पवर असलेला चेंडू खेळायला गेला आणि बाद होऊन माघारी परतला. बोलँडने ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकलेल्या चेंडूवर विराटने कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला. मात्र हा चेंडू बॅटची कडा घेत यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरीच्या हातात गेला. विराट ११ धावा करत माघारी परतला.

तिसरा कसोटी सामना, पहिला डाव

ब्रिस्बेनमध्ये पार पडलेल्या तिसऱ्या कसोटीतही कव्हर ड्राईव्हमुळे विराट कोहलीची विकेट गेली. पुन्हा एकदा विराटने ऑफ स्टम्पच्या बाहेर असलेल्या चेंडूवर बॅट लावली आणि चेंडू बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरीच्या हातात गेला.

चौथा कसोटी सामना, पहिला डाव

चौथ्या कसोटीत विराटने दृढ निश्चय केला होता की, ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणारे खेळाडू खेळायचे नाही. त्याचा हा प्लान सस्केसफुल ठरत होता. मात्र ८५ चेंडू खेळून झाल्यानंतर ८६ व्या चेंडूवर विराटची बॅट ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू खेळण्यासाठी पुढे आणि तो बाद झाला.

चौथा कसोटी सामना, दुसरा डाव

या सामन्यातील दुसऱ्या डावातही विराट ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू खेळताना बाद झाला. स्टार्कच्या गोलंदाजीवर उस्मान ख्वाजाने अचूक झेल टीपला आण विराट ५ धावांवर माघारी परतला.

पाचवा कसोटी सामना, पहिला डाव

विराटचा आवडता शॉट कमजोरी ठरु लागला आहे. पाचव्या कसोटीतही विराटने बाहेर जाणारे चेंडू सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या सामन्यातही त्याच्याकडून तिच चूक घडली. बाहेर जाणाऱ्या चेंडूवर विराटने बॅट लावली. इतक्यात चेंडू बॅटची कडा घेत वेबस्टरच्या हातात गेला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News: स्तन वाढवण्यासाठी सर्जरी केली, काही तासांत १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला

Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर २ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक; लोकलसह ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, वाचा सविस्तर

Sakhi Gokhale: मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

Prabalgad Fort History: ट्रेकिंगसाठी खास! सह्याद्री पर्वतरांगेतील प्रबळगड किल्ल्याचे ऐतिहासिक वैशिष्ट्ये आणि इतिहास

SCROLL FOR NEXT