virat kohli  Saam tv
Sports

IND vs AUS : इथेच सामना फिरला, अन्यथा भारताच्या हातून फायनल निसटली असती,VIDEO

virat Kohli Catch dropped : ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्यात विराटने चमकदार खेळी खेळली. या सामन्यात विराटची मॅक्सवेलने कॅच सोडली. मात्र, या कॅचमुळे ऑस्ट्रेलिायाने सामना गमावल्याचं बोललं जात आहे.

Vishal Gangurde

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरोधात चांगली कामगिरी करत फायनलमध्ये धडक मारली आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाला नाकीनऊ आले होते. मात्र, विराट कोहलीच्या खेळीने भारताला तारलं. कोहली ८४ धावांवर बाद झाला. मात्र, संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवलं. या सामन्यात मॅक्सवेलने विराटची कॅच सोडली. तिथेच सामना फिरल्याचं दिसलं.

विराट कोहली ऑस्टेलियाविरोधात चमकदार खेळी खेळताना दिसला. विराट कोहलीच्या आक्रमक खेळीमुळे भारत जिंकला. विराट कोहली २६ षटकात झेलबाद होता होता बचावला. ग्लेन मॅक्सवेलने विराट कोहलीचा कॅच सोडला. त्यानंतर विराट कोहली सावध झाला. जीवदान मिळाल्यानंतर विराट कोहलीने संयमी खेळी सुरु केली. विराट कोहलीची कॅच सोडल्याने त्याला जीवदान मिळालं. त्यानंतर मॅक्सवेलच्या चेंडूवर एलबीडब्लूसाठी अपील करण्यात आली होती. विराट कोहली ७० ते ८० धावा दरम्यानही थोडक्यात बाद होता होता वाचला.

अन् कॅच सुटला

विराट कोहलीने चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवर ग्लेन मॅक्सवेलच्या उजवीकडे मारला. त्यानंतर मॅक्सवेलने कॅच घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू त्याच्या हातात बसला. कॅच हातातून सुटल्यानंतर विचारात पडला. मॅक्सवेल थोडा वेळ विचार करत जमिनीवर पडून राहिला.

टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलमध्ये धडक मारली आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियासमोर विजयासाठी २६५ धावांचे आव्हान ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना विराटच्या दमदार खेळीच्या बळावर भारताने ४ गडी राखून विजय मिळवलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple cutting Tips: सफरचंद कापल्यानंतर काळे का पडतात?

Bridal Look Care: या ५ चुकांमुळे नेहमी खराब होतो ब्राइडल लूक...; तुमचं लग्न जर यावर्षी ठरलं असेल तर घ्या ही काळजी

Ginger Garlic Paste: मीठ आणि तेल वापरून बनवा आलं- लसूणाची पेस्ट, दिर्घकाळ टिकेल

Maharashtra Live News Update: आदिती तटकरेंच्या मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढलीपदाधिकाऱ्यांची भावना

Maharashtra Politics: शिवसेनेत उलथापालथ! भास्कर जाधवांच्या निकटवर्तीयाची ठाकरे गटातून हकालपट्टी; कोकणात राजकीय भूकंप

SCROLL FOR NEXT