Rohit Sharma : रोहित शर्माच्या नावावर नकोसा रेकॉर्ड, सलग १४ सामन्यांत हरला टॉस, रिझल्ट काय लागला?

Ind vs Aus Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील उपांत्य फेरीतील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना सुरु आहे. या सामन्याचा टॉस ऑस्ट्रेलियाने जिंकला आणि रोहित शर्माच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली.
rohit sharma unwanted record ind vs aus
rohit sharma unwanted record ind vs aussaam tv
Published On

Rohit Sharma : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील उपांत्य फेरीतल्या पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे संघ आमनेसामने आले आहेत. या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये कोण जिंकणार याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. दरम्यान सामना सुरु होण्यापूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्माने लाजिरवाणा विक्रम केला आहे.

दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना सुरु आहे. सामन्यापूर्वी दोन्ही संघांचे कर्णधार टॉससाठी मैदानात उतरले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस हरत नकोसा विक्रम नोंदवला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात टॉस हारत रोहित शर्माने विक्रम केला आहे. रोहित एकदिवसीय क्रिकेटमध्ये तब्बल १४ वेळा टॉस हरला आहे. वनडे फॉरमॅटमध्ये वर्ल्डकप २०२३ पासून ते चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पर्यंत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा १४ वेळा टॉस हरला आहे. पण १४ पैकी ११ सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला.

rohit sharma unwanted record ind vs aus
Virat Kohli Dance: भारताची डोकेदुखी गेली! हेड बाद होताच विराट कोहलीचा मैदानावरच जबरदस्त डान्स -VIDEO

भारतीय संघाच्या नावावर देखील १४ वेळा टॉस हरण्याच्या विक्रमाची नोंद झाली आहे. यापूर्वी हा विक्रम नेदरलँडच्या क्रिकेट संघाच्या नावावर होता. ते सलग ११ वेळा वनडे फॉरमॅटमध्ये टॉस हारले होते. आता नेदरलँडच्या या नकोशा विक्रमांची नोंद भारताच्या नावावर झाली आहे.

rohit sharma unwanted record ind vs aus
Champions Trophy 2025 : रोहित सेना काळी पट्टी बांधून का उरतलीये मैदानात? हे आहे खरं कारण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com