Virat kohli counter celebration on rilee russouw gun celebration watch video amd2000 twitter
Sports

Virat Kohli Celebration: नाद करा पण आमचा कुठं! रुसोच्या सेलिब्रेशनला विराटचं तोडीस तोड उत्तर - Video

Virat Kohli- Rilee Russouw Celebration: आयपीएल २०२४ स्पर्धेत प्लेऑफमध्ये जाण्याच्या दृष्टीने जाण्यासाठी अतिशय महत्वाच्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेत प्लेऑफमध्ये जाण्याच्या दृष्टीने जाण्यासाठी अतिशय महत्वाच्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. धरमशालेच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेजंर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात पंजाब किंग्ज संघाला ६० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.

या पराभवासह पंजाबची आयपीएल २०२४ स्पर्धेतून एक्झिट झाली आहे. २४२ धावांचा पाठलाग करताना पंजाबकडून रिले रुसोने एकाकी झुंज दिली. त्याने अर्धशतकी खेळी केली. अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने गोळीबार करत असल्याचं सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनला विराटनेही तोडीस तोड उत्तर दिलं. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विराट कोहली म्हणजे फुल ऑन एन्टरमेंट. फलंदाजी करताना तो चौकार षटकार खेचून चाहत्यांचं मनोरंजन करत असतो. तर मैदानावर क्षेत्ररक्षण करत असताना आपल्या डान्सने आणि उत्कृष्ठ क्षेत्ररक्षणाने तो चाहत्यांचा पैसा वसूल करुन देतो. पंजाबला हा सामना जिंकण्यासाठी २४२ धावांची गरज होती.

या धावांचा पाठलाग करताना पंजाबलाही आक्रमक सुरुवातीची गरज होती. पंजाबकडून रिले रुसोने शानदार फलंदाजी केली. त्याने २७ चेंडूंचा सामना करत ९ चौकार आणि ३ षटकारांसह ६१ धावांची खेळी केली. दरम्यान अर्धशतक पूर्ण केल्यानंतर तो गुडघ्यावर बसला आणि अवकाशाच्या दिशेने बॅट दाखवत त्याने गोळीबार सेलिब्रेशन केलं.

तो संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जात होता. नेमकं त्याचवेळी कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर विल जॅक्सने शानदार झेल टिपला आणि रिले रुसोला पॅव्हेलियनची वाट दाखवली. रुसो बाद होताच विराटने त्याच्या गोळीबार सेलिब्रेशनला प्रत्युत्तर दिले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मुख्य बाब अशी की, दोघांमध्ये इशाऱ्यातच चकमक झाली असली, तरी ही गमतीशीर चकमक होती. हा सामना झाल्यानंतर दोन्ही खेळाडूंची भेटही घेतली होती.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने २० षटकअखेर २४१ धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून विराट कोहलीने सर्वाधिक ९२ धावांची खेळी केली. तर रजत पाटीदारने ५५ आणि ग्रीने ४६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना पंजाबचा संपूर्ण डाव १८१ धावांवर आटोपला. पंजाबला हा सामना ६० धावांनी गमवावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT