virat kohli twitter
Sports

Virat kohli Century: किंग कोहलीचा दरारा.. कालपण आणि आजपण! तब्बल १२०५ दिवसांनी साजरं केलं कसोटी शतक - VIDEO

या सामन्यात भारतीय संघातील फलंदाज विराट कोहलीने जोरदार शतक झळकावले आहे.

Ankush Dhavre

Ind vs Aus 4th test virat kohli century: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे.

या सामन्यात भारतीय संघातील फलंदाज विराट कोहलीने जोरदार शतक झळकावले आहे. हे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील २८ वे शतक आहे. (Latest sports updates)

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी फलंदाजी करण्यासाठी आलेल्या विराटने संयमी खेळी करत सुरुवात केली होती. त्याने तिसऱ्या दिवसअखेर ५९ धावा केल्या होत्या. तर चौथ्या दिवशी त्याने आपले शतक पूर्ण केले आहे. २०१९ नंतर हे त्याचे पहिलेच शतक आहे.

विराटने २०१९ मध्ये झळकावले होते शेवटचे शतक..

गेल्या ४ वर्षांपासून विराट कोहली शतक झळकावण्याची वाट पाहत होता . ही प्रतीक्षा आता संपली आहे. त्याने २०१९ मध्ये बांगलादेश विरुध्द झालेल्या सामन्यात १३६ धावांची खेळी केली होती. ही त्याची शेवटची शतकी खेळी ठरली होती. त्यानंतर ४ वर्ष तो कसोटी क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावू शकला नव्हता.

शुभमनची तुफानी खेळी..

या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेलता होता. प्रथम फलंदाजी करताना ४८० धावांचा डोंगर उभारला होता. या धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने देखील जोरदार सुरुवात केली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी मिळून अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर रोहित शर्मा ३५ धावा करत माघारी परतला. मात्र शुभमन किल्ला लढवत राहिला. त्याने तुफानी शतक झळकावत १३८ धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तोडा-फोडा राज्य करा, ही यांची निती - ठाकरे

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

SCROLL FOR NEXT