virat kohli  twitter
क्रीडा

Virat Kohli Dance Video: विराटचा नाद करायचा नाय! फलंदाज बाद होताच किंग कोहलीचा बिहू डान्स -VIDEO

Ankush Dhavre

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला ३२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटल्यानंतर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने भारतीय संघाला जिंकण्यासाठी २४१ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र भारतीय संघाला या धावांचा यशस्वी पाठलाग करता आलेला नाही. दरम्यान या सामन्यातील एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय,ज्यात विराट कोहली बिहू डान्स करताना दिसून येत आहे.

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा मैदानावर आपल्या फलंदाजीसह डान्ससाठीही तितकाच प्रसिद्ध आहे. यापूर्वीही तो मैदानावर क्षेत्ररक्षण करताना अनेकदा डान्स करताना दिसून आला आहे. दरम्यान श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत तो बिहू डान्स करताना दिसून आला आहे. तर झाले असे की, श्रीलंकेची फलंदाजी सुरु असताना २६ वे षटक सुरु होते. त्यावेळी त्याने समरविक्रमाचा झेल टिपला. अक्षर पटेल गोलंदाजी करत होता. त्यावेळी समरविक्रमाने स्टेप आऊट होऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू बॅटची कडा घेत हवेत गेला.

हा चेंडू हवेत जाताच विराट कोहली धावला आणि त्याने झेल टिपला. दरम्यान झेल टिपताच त्याने ड्रेसिंग रुमकडे पाहिलं आणि बिहू डान्स केला. असं म्हटलं जात आहे की, रियान पराग ड्रेसिंग रुममध्ये होता. त्याला पाहून विराटने बिहू डान्सचा इशारा केला.

भारतीय संघाचा पराभव

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने २४० धावा केल्या होत्या. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २४१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिलने मिळून ९७ धावांची भागीदारी केली. रोहितने अर्धशतकी खेळी केली. तर अक्षर पटेलने ४४ धावांची खेळी केली.या दोघांना वगळलं, तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आलं नाही. दरम्यान हा सामना भारतीय संघाला ३२ धावांनी गमवावा लागला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

PM Vishwakarma Yojana: वर्षभरात ६ लाख लाभार्थी, २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी केलेय रजिस्ट्रेशन, योजनेचा कसा घ्याल लाभ?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

CIDCO Lottery 2024: गुड न्यूज! म्हाडापाठोपाठ सिडकोच्या घरांच्या किमती १० टक्क्यांनी कमी होणार?

Prajakta Mali Phullwanti Dance: प्राजक्ता माळी शिकवतेय स्टेप बाय स्टेप डान्स; Video पाहिलात का?

SCROLL FOR NEXT