Virat kohli  saam tv
क्रीडा

Virat Kohli Record: कोहलीचा ‘विराट’ कारनामा! आजपर्यंत IPL स्पर्धेत कोणत्याच फलंदाजाला न जमलेला विक्रम केला नावावर

Virat Kohli Record In IPL: कर्णधार विराट कोहलीच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

Ankush Dhavre

PBKS VS RCB: आयपीएल २०२३ स्पर्धेतील २७ वा सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. या सामन्यात फाफ डू प्लेसिसच्या जागी विराट कोहली संघाचे नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरला आहे.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला चांगली सुरुवात मिळाली आहे. दरम्यान कर्णधार विराट कोहलीच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

विराटचा विराट कारनामा..

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली हा आपल्या फलंदाजीसह आपल्या विक्रमांसाठी देखील ओळखला जातो. पंजाब संघाविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात देखील त्याची तुफानी फटकेबाजी पाहायला मिळाली आहे. या डावात ३० धावांचा आकडा पार करताच विराटने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. (Virat kohli records in IPL)

असा कारणामा करणारा विराट पहिलाच फलंदाज..

विराटने या डावात डू प्लेसिस सोबत मिळून अप्रतिम फलंदाजी केली. त्याने ३० धावांचा आकडा गाठताच शतक पूर्ण केले आहे. त्याने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात तब्बल १०० वेळेस ३० धावांचा आकडा पार केला आहे. आयपीएल स्पर्धेत असा कारनमा करणारा तो एकमेव फलंदाज ठरला आहे. (Latest sports updates)

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग 11:

पंजाब किंग्ज:

अथर्व तायडे, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंग भाटिया, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, राहुल चहर, अर्शदीप सिंग

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू:

विराट कोहली (कर्णधार), फाफ डू प्लेसिस, महिपाल लोमरर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदू हसरंगा, सुयश प्रभुदेसाई, हर्षल पटेल, वेन पारनेल, मोहम्मद सिराज

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : ठाण्यात निकालापूर्वी विजयाची बॅनर बाजी...

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT