Virat Kohli News Saam tv
Sports

Virat Kohli News: वनडेत कोहलीचा 'विराट' रेकॉर्ड; जगात कुठल्याही फलंदाजाला जमलं नाही,सचिन तेंडुलकरलाही टाकले मागे

Virat Kohli: विराटने पाकिस्तान विरोधात ७७ वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकलं. तसेच विराटने वनडेतील सर्वात जलद १३००० धावा ठोकल्या.

Vishal Gangurde

Virat Kohli New Records:

कोलंबोच्या प्रेमदासा मैदानात भारतीय फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. या सामन्यात भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने सोमवारी पाकिस्तानी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. विराट कोहली पाकिस्तान विरोधात तुफान फॉर्मात दिसला. विराटने पाकिस्तान विरोधात ७७ वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकलं. तसेच विराटने वनडेतील सर्वात जलद १३००० धावा ठोकल्या. यावेळी विराटने सचिन तेंडुलकरचाही रेकॉर्ड मोडला. (Latest Marathi News)

आशिया कपच्या सुपर-४ स्टेजमध्ये भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांना धू-धू धुतलं. कोहलीने ९४ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १२२ धावा कुटल्या. या सामन्यात विराटने वनडेतील सर्वात जलद १३ हजार धावा कुटल्या. (Cricket News)

विराट कोहलीने २६७ डावांमध्ये १३००० धावा कुटल्या. तर सचिनने वनडेत ३२१ डावांमध्ये १३ धावा पूर्ण केल्या होत्या. कोहलीने वनडेमधील ४७ वे शतक ठोकलं. विराट कोहली हा वनडेत १३ हजार धावा करणारा जगातला पाचवा आणि भारताचा दुसरा खेळाडू ठरला आहे.

ऑस्ट्रेलिया माजी क्रिकेटपटू रिकी पॉटिंगने ३४१ डावात १३ हजार धावा ठोकल्या होत्या. तर श्रीलंकेच्या कुमार संगकाराने ३६३ डावांमध्ये १३ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. तर श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याने ४१६ धावांमध्ये १३ धावा पूर्ण केल्या होत्या.

तत्पूर्वी, विराट कोहलीने आतापर्यंत सर्वात जलद ९,१०,११ आणि १२ हजार धावा करणारा खेळाडू धरला आहे. विराट कोहली लवकरच सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे. विराट सचिनचा

सर्वाधिक शतक ठोकण्याच्या विक्रमापासून दोन शतक दूर आहे. विराट कोहलीने आतापर्यंत वनडेमध्ये ४७ शतक ठोकले आहेत. तर सचिनचे वनडेमध्ये ४९ शतकांचा विक्रम आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात विराट आणि केएल राहुलने २३३ धावांची भागीदारी रचली. दोघांनी टीम इंडियासाठी धावांचा डोंगर उभा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nora Fatehi Accident: मोठी बातमी! बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात

Navi Mumbai Politics: शरद पवार गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Maharashtra Election: भाजपची इन्कामिंग एक्सप्रेस सुसाट,पुण्याचे माजी महापौर हाती घेणार कमळ?

Sunday Horoscope : जिवनाचं खरं सार्थक होणार; ५ राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार

अकोल्याच्या बाळापूर नगरपरिषदेवर कुणाचं वर्चस्व असणार? 'वंचित' सत्ताधाऱ्यांना धक्का देणार?

SCROLL FOR NEXT