Virat Kohli Cricket Form Instagram/@virat.kohli
Sports

विराट कोहली आउट ऑफ फॉर्म, टीम इंडियाच्या माजी कर्णधाराचं मोठं विधान

Virat Kohli Cricket Form : खराब फॉर्मात असलेल्या विराटला आयपीएल स्पर्धेतही चमकदार कामगिरी करता आली नाही. 'आउट ऑफ फॉर्म' असलेल्या विराटवर आता टीका होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: एकेकाळी 'रनमशीन' अशी ओळख असलेल्या विराट कोहलीच्या बॅटमधून आता पूर्वीप्रमाणे धावा निघत नाहीत. खराब फॉर्मात असलेल्या विराटला आयपीएल स्पर्धेतही चमकदार कामगिरी करता आली नाही. 'आउट ऑफ फॉर्म' असलेल्या विराटवर (Virat Kohli) आता टीका होत आहे. मात्र, टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन (Mohammad Azharuddin) यांनी विराटला पाठिंबा दर्शवला आहे. विराट कोहली इंग्लंड दौऱ्यात फॉर्ममध्ये पुन्हा येईल. तो चांगली कामगिरी करेल, असा विश्वास अजहरुद्दीन यांनी व्यक्त केला.

हे देखील पाहा -

विराट कोहलीच्या फलंदाजीच्या तंत्रात कोणतीही उणीव दिसून येत नाही. जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजांनाही आपल्या कारकिर्दीत हा काळ बघावा लागतो, असं भारताचे सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ख्याती असलेल्या अजहरुद्दीन म्हणाले.

कोहली जेव्हा ५० धावा करतो, त्यावेळी तो अपयशी ठरला असं वाटतं. नक्कीच त्याने यावर्षी चमकदार कामगिरी केली नाही. पण प्रत्येक जण आपल्या कारकिर्दीत अशा वाईट काळातून जात असतो. त्याला थोडा ब्रेक मिळाला आहे. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यात विराट आपल्या पूर्वीच्या फॉर्ममध्ये परत येईल असे वाटते, असं अजहरुद्दीन एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (Cricket) कोहलीने जवळपास तीन वर्षांपासून शतक केलेले नाही. त्याने आपलं शेवटचं शतक नोव्हेंबर २०१९मध्ये केलं होतं. बांगलादेशविरुद्धच्या डे-नाइट कसोटी सामन्यात ते शतक केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC आरक्षण संपवल्यात जमा..., व्हॉट्सअप स्टेटस ठेवत तरुणाची आत्महत्या; मुख्यमंत्र्यांना केली विनंती

Kantara Chapter 1 Collection : बॉक्स ऑफिसवर 'कांतारा' चं तुफान, आठवड्याभरात पार केला 300 कोटींचा टप्पा

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरमध्ये असदउद्दीन ओवेसीची आज होणार सभा

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई, 34 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त, ५ जणांना अटक

Pune Terror Alert : पुण्यात मध्यरात्री ATS कडून २५ ठिकाणी छापेमारी, दहशतवादी नेटवर्क सक्रिय? अनेक संशयित ताब्यात

SCROLL FOR NEXT