virat kohli twitter
Sports

Virat- Anushka: विराट अन् अनुष्काचं प्रेमानंद महाराजांसमोर लोटांगण; VIDEO व्हायरल

Virat Kohli Anushka Sharma Meeting Premanand Ji Maharaj: विराट कोहली आणि अनुष्का शर्माने आपल्या मुलांसह प्रेमानंद महाराजांची भेट घेतली आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघातील स्टार फलंदाज विराट कोहली बॉर्डर- गावसकर मालिकेत पूर्णपणे फ्लॉप ठरला. या मालिकेत त्याची बॅट शांतच राहिली. दरवेळी मालिका झाल्यानंतर, विराट कोहली लंडनला जातो.

मात्र यावेळी त्याने लंडनला न जाता नीम करौली बाबाच्या चरणी हजेरी लावली आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्माने आपल्या मुलांसह प्रेमानंद महाराज बाबाची भेट घेतली आहे. यादरम्यान विराट आणि अनुष्का नतमस्तक होऊन बाबांचा आशीर्वाद घेताना दिसून आले.

आशीर्वाद घेण्यासाठी लावली हजेरी

विराट कोहली यापूर्वीही जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावा करण्यात संघर्ष करत होता. त्यावेळी त्याने नीम करोली धामला हजेरी लावली होती. अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि खेळाडू वृंदावनातील प्रसिद्ध संत हित प्रेमानंद गोविंद शरण यांचं दर्शन घेण्यासाठी हजेरी लावत असतात. विराट आणि अनुष्का दोघेही दुसऱ्यांदा त्यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत.

दोघांनी जेव्हा बाबांची भेट घेतली, त्यावेळी बाबांनी त्यांची विचारपूस केली. अनुष्का त्यांना म्हणाली की, 'आम्ही मागच्या वेळी जेव्हा आलो होतो, त्यावेळी मला खूप काही विचारायचं होतं. पण तिथे खूप लोकं होती, त्यांनाही काहीतरी विचारायचं होतं. पण मी मनातल्या मनात तुमच्याशी संवाद साधत होते.'

विराट- अनुष्काने घेतला आशीर्वाद

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दोघांनीही बाबांचे आशीर्वाद घेतले. बाबांनी दोघांचही कौतुक केलं, ते म्हणाले, ' हे दोघेही खूप बहादूर आहेत. संसारातील सर्व यश मिळवल्यानंतर भक्तिकडे वळणं खूप कठीण असतं. तुम्ही देवाच्या नामाचा जप करा, आनंदी राहा.'

विराट कोहलीचा फ्लॉप शो

नुकताच पार पडलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर- गावसकर कसोटी मालिकेत भारतीय संघाला १-३ ने पराभवाचा सामना करावा लागला. या मालिकेत विराट कोहलीला १९० धावा करता आल्या. विराटने पहिल्याच कसोटीत शानदार शतकी खेळी केली होती. मात्र त्यानंतर विराटला एकही अर्धशतकी खेळी करता आली नव्हती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : भारतात अस्थिरता निर्माण करण्यासाठी अमेरिका, चीन प्रयत्नशील, प्रवीण दीक्षित यांचे मत

Ind Vs Sa: चौथ्या सामन्यात बुमराह करणार कमबॅक? पाहा सिरीज जिंकण्यासाठी कशी असेल भारताची प्लेईंग 11

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये काँग्रेसला उतरती कळा, माजी महापौर, माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Madhuri Dixit Photos : "परी हो या हो परियों की रानी..."; गुलाबी ड्रेसमध्ये 'धक धक गर्ल'चं आरस्पानी सौंदर्य

शरद पवरांच्या खासदाराने घेतली अमित शाहांची भेट, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT