Virat Kohli Angry Video x
Sports

Virat Kohli : आरसीबीच्या कर्णधारावर विराट कोहली नाराज, भर मैदानात राग अनावर; पण चूक काय होती?

Virat Kohli Angry Video : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या सामन्यादरम्यान विराट कोहलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात विराट रागारागात दिनेश कार्तिकशी चर्चा करत असल्याचे पाहायला मिळते.

Yash Shirke

Virat Kohli Video : चिन्नास्वामी स्टेडियम काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना खेळला गेला. या सामन्यात दिल्लीने ६ विकेट्सनी बंगळुरूचा पराभव केला. केएल राहुलच्या नाबाद ९३ धावांच्या खेळीमुळे दिल्लीने सलग चौथा विजय मिळवला. बंगळुरू विरुद्ध दिल्ली सामन्यादरम्यान विराट कोहलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात तो दिनेश कार्तिकसोबत रागात चर्चा करताना दिसला.

दिल्लीचा संघ फलंदाजी करताना १६ व्या ओव्हरमध्ये केएल राहुल मैदानात टिकून खेळत होता. त्या दरम्यान विराट कोहली आरसीबीचे फलंदाजी विभागाचे प्रशिक्षक दिनेश कार्तिकसह रागारागात काहीतरी बोलत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले. या व्हिडीओमुळे विराट कोहली आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारच्या निर्णयावर खुश नसल्याचे म्हटले जात आहे.

त्यावेळी आकाश चोप्रा आणि वीरेंद्र सेहवाग कॉमेंट्री बॉक्समध्ये होते. जर विराट कोणत्या निर्णयावर नाराज असेल, तर त्याने कर्णधार पाटीदारशी त्याविषयी बोलायला हवे, असे त्यांनी म्हटले. रजत पाटीदारने घेतलेल्या निर्णयावरुन विराट कोहलीने फक्त दिनेश कार्तिकच नाही, तर भुवनेश्वर कुमारशीदेखील चर्चा केल्याचे सोशल मीडियावर चाहते म्हणत आहेत. पण विराट कोहली नेमका कोणत्या कारणामुळे चिडला होता याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

दरम्यान काल घरच्या स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दिल्ली कॅपिटल्सने पराभव केला. दिल्लीच्या विजयात केएल राहुलचा मोलाचा वाटा होता. दुसऱ्या इनिंगमध्ये दिल्लीचे फलंदाज लागोपाठ माघारी परतत होते. तेव्हा केएल राहुलने एका बाजूने मोर्चा सांभाळला. शेवटपर्यंत तो मैदानात टिकून होता. त्याच्या ९३ धावांमुळे दिल्लीने सलग चौथा विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील नवले पुलावर अपघातमुळे मोठी वाहतूक कोंडी

Ajit Pawar Death: अजितदादांच्या अपघाताची निष्पक्ष चौकशी करा, जय पवारांची मोठी मागणी

Bhiwandi Crime: उपमुख्यमंत्र्यांची भेट करून देतो म्हणून लॉजवर नेलं; सेना कार्यकर्त्याचा महिलेवर अत्याचार

मृत्यूनंतरही दादांच्या बदनामीचं कारस्थान, 2 वर्षात अजितदादांनी कमवले 1100 कोटी? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Abhishek Sharma : सिराजची जर्सी घातली, पण धावांचा 'अभिषेक' नाहीच! वर्ल्ड नंबर १ शर्मा पुन्हा शून्यावर आऊट, कारण चक्रावणारं

SCROLL FOR NEXT