virat kohli and arshdeep singh dance video twitter
Sports

Virat Kohli Dance: हे नाही पाहिलं तर काय पाहिलं..WC विजयानंतर विराटचा अर्शदीप सिंगसोबत भागंडा डान्स- video

Virat Kohli Arshdeep Singh Dance Video: भारतीय संघाच्या विजयानंतर अर्शदीप सिंग आणि विराट कोहलीने भांगडा केला आहे.

Ankush Dhavre

वर्ल्डकप स्पर्धेतील नॉकआउट फेरीतील पराभवाच्या मालिकेला अखेर पूर्णविराम लागला आहे. भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. या विजयानंतर भारतीय खेळाडू जल्लोष करताना दिसून आले आहेत. भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली मैदानात असताना नेहमीच उत्साहात असतो. स्टेडियममध्ये गाणं वाजलं तरी हा खेळाडू आपल्या डान्स मूव्ह दाखवताना दिसून येतो.

यावेळी औचित्य वर्ल्डकप विजयाचं होतं त्यामुळे जल्लोषही तितकाच जोरदार झाला. सामन्यानंतर विराट कोहली आणि अर्शदीप सिंग डान्स करताना दिसून आले आहेत. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

भारताच्या वर्ल्डकप विजयाचा जल्लोष अर्शदीप सिंग आणि विराट कोहलीने भांगडा करत साजरा केला आहे. दोघांनी दिलेर मेहंदीचं प्रसिद्ध गाणं 'तुनक तुनक तुन' वर भन्नाट डान्स केला आहे. या दोघांना अक्षर पटेल, रिंकू सिंग आणि मोहम्मद सिराजची जोड मिळाली. हे सर्व खेळाडू भन्नाट डान्स करताना दिसून आले.

कोहलीची निवृत्ती

भारतीय संघाने ही स्पर्धा जिंकली याचा आनंद आहेच. मात्र कोट्यावधी क्रिकेट फॅन्सला निराश करणारी बाब म्हणजे विराट कोहलीने टी -२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे तो यापुढे भारतीय संघासाठी टी -२० क्रिकेट खेळताना दिसून येणार नाही. २०२६ मध्ये पुढील टी -२० वर्ल्डकप होणार आहे. या स्पर्धेसाठी युवा खेळाडूंना संधी मिळावी म्हणून विराटने हा निर्णय घेतला आहे.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, संपूर्ण स्पर्धेत फ्लॉप ठरलेल्या विराटने आपली सर्वोत्तम खेळी फायनल सामन्यासाठी राखून ठेवली होती. त्याने ५९ चेंडूंचा सामना करत ७६ धावांची खेळी केली. यासह तो या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. दरम्यान या खेळीच्या बळावर भारतीय संघाने २० षटक अखेर ७ गडी बाद १७६ धावा केल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शिंदे गटाला झटका, महिला नेत्याचा अजित पवार गटात जाण्याचा निर्णय

पश्चिम महाराष्ट्रात शिंदेंना भाजपचा धक्का, आमदाराच्या भावासह ४० पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र!

Body changes after death: मृत्यूनंतर व्यक्तीचं तोंड अनेकदा का उघडं राहतं?

Arjun Tendulkar : सचिनच्या पावलावर चालत अर्जुनने केला साखरपुडा; वयाचं गुपित ऐकून चाहत्यांमध्ये रंगली चर्चा

Maharashtra Live News Update: रायगडच्या पायथ्याशी जोरदार पाऊस

SCROLL FOR NEXT