Virat Kohli Anushka Sharma and Premanand ji Maharaj - social media saam tv
Sports

गळ्यात तुळशी माळ, कपाळी टिळा...विराट कोहली-अनुष्का शर्मा प्रेमानंद महाराजांच्या दरबारी; VIDEO व्हायरल

Virat Kohli - Anushka Sharma in vrindavan : आयपीएल स्पर्धा सुरू असतानाच स्टार फलंदाज विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी पुन्हा एकदा आध्यात्मिक मार्ग स्वीकारत वृंदावन गाठलंय. सध्या विराट आयपीएलमध्ये खेळण्यात व्यस्त आहे. तरी देखील त्याने वेळ काढून वृंदावनला भेट दिली. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Nandkumar Joshi

गळ्यात तुळशी माळ, कपाळावर टिळा आणि प्रवचन ऐकण्यात दंग...विराट कोहलीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या आयपीएलमध्ये व्यग्र आहे. पण इतक्या बीझी शेड्युलमध्येही विराट हा पत्नी अनुष्का शर्मा हिच्यासोबत वृदांवनात पोहोचला. या दोघांनी श्रीहित राधा केलि कुंज आश्रमातील प्रसिद्ध प्रमानंद महाराजांचं दर्शन घेतलं. त्यांचा आशीर्वाद घेतला. विराट आणि अनुष्काचा या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रेमानंद महाराजांचं प्रवचन ऐकण्यात विराट-अनुष्का दंग

वृदांवनात पोहोचलेल्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेतले. दोघांनीही सर्वसामान्य भक्तांसोबत बैठकीला बसून, प्रेमानंद महाराजांचं प्रवचन ऐकलं. या संपूर्ण भेटीत दोघेही अत्यंत साधेपणाने वावरत होते. दोघांमध्ये कमालीची नम्रता दिसून आली. सर्वसामान्य भक्तांप्रमाणेच या दोघांनी आश्रमातील सर्व नियमांचे पालन करत महाराजांचं प्रवचन ऐकलं. त्यांचा हा नम्र स्वभाव चाहत्यांना भलताच भावला असून, दोघांचेही कौतुक होत आहे.

५ महिन्यांत तिसऱ्यांदा वृंदावनात

आश्रमाच्या अधिकृत युट्यूब चॅनल 'भजन मार्ग'वर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. विराट कोहली आणि अनुष्का हे दोघेही मुख्य सभागृहात अन्य भक्तांसोबत जमिनीवर बसून शांततेचा अनुभव घेताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. प्रेमानंद महाराजांचं प्रवचन लक्षपूर्वक ऐकत असल्याचेही पाहायला मिळत आहे. मागील पाच महिन्यांत दोघेही तिसऱ्यांदा वृंदावनात गेले आहेत. हे दोघेही आश्रमाला नियमित भेटी देतात. त्यांची या वर्षातील ही दुसरी भेट आहे.

याआधी ते फेब्रुवारीत वृंदावनात आले होते. मागील वर्षीही सर्वात चर्चेत असलेलं जोडपं तीन वेळा आश्रमात आले होते. जानेवारीत हे दोघे मुलांसोबत वृंदावनात आले होते. मे महिन्यात विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतरही हे दोघे आश्रमात आले होते. तर डिसेंबरमध्येही दोघांनी प्रेमानंद महाराजांची भेट घेतली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT