IND vs SA
Virat Kohli & R Ashwin
IND vs SA Virat Kohli & R Ashwin Twitter/ @BCCI
क्रीडा | IPL

IND vs SA: कोहली, रहाणे, पुजारा, आश्विन खास रेकॉर्डच्या उंबरठ्यावर

वृत्तसंस्था

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना (IND vs SA 3rd Test) 11 जानेवारीपासून केपटाऊन येथे खेळवली जाणार आहे. यासाठी दोन्ही संघ केपटाऊनला पोहोचले आहेत. मालिका सध्या सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. सेंच्युरियन येथे खेळवण्यात आलेला पहिला कसोटी सामना भारताने 113 धावांनी जिंकला होता तर, दुसरीकडे, जोहान्सबर्गमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 7 विकेट्सने विजय मिळवला होता. अशा स्थितीत तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे.

नियमित कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पाठीच्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीत खेळू शकला नाही. अशा परिस्थितीत त्याच्या जागी केएल राहुलकडे (KL Rahul) संघाची कमान सोपवण्यात आली होती. त्याचबरोबर विराट कोहली तंदुरुस्त झाला असून तो शेवटच्या कसोटी सामन्यात पुनरागमन करू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताच्या नजरा सीरिज जिंकण्याकडे असणार आहेत. असे झाल्यास भारत दक्षिण आफ्रिकेत प्रथमच कसोटी मालिका (Test Series) जिंकण्याचा विक्रम आपल्या नावावर कऱणार आहे. या सामन्यात विराट कोहलीसह अनेक खेळाडू अनेक विक्रम आपल्या नावावर करू शकतात.

भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहलीला विक्रम करण्याची संधी आहे. तो कसोटीत 8000 धावा पूर्ण करू शकतो. सध्या विराट कोहलीने 98 कसोटी सामन्यांच्या 166 डावांमध्ये 51 च्या सरासरीने 7854 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 27 शतके आणि 27 अर्धशतकेही केली आहेत. (Virat Kohli, Ajinkya Rahane, R Ashwin Record)

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना जिंकल्यानंतर विराट कोहली कर्णधार म्हणून 41 कसोटी सामने जिंकणार आहे. या बाबतीत तो ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह वॉला मागे टाकू शकतो. वॉने 57 पैकी 41 कसोटी सामने जिंकले. विराट कोहलीने 67 पैकी 40 कसोटी सामने जिंकले आहेत. वॉचा विक्रम मोडण्यापासून तो फक्त एक विजय दूर आहे.

आर अश्विनला हा विक्रम करण्याची संधी आहे

* न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अश्विनने हरभजन सिंगचा विक्रम मोडला.

* तो आता भारतासाठी कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज आहे.

* दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कपिल देव सह अनेक दिग्गजांना तो मागे टाकू शकतो.

* दिग्गज क्रिकेटपटू कपिल देवचा विक्रम मोडण्यासाठी अश्विनला 5 विकेट्सची गरज आहे.

* यासह तो भारताकडून कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज बनेल.

* अनिल कुंबळे (619) याने भारताकडून कसोटीत सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत.

रहाणे कसोटीत 5 हजार धावा पूर्ण करू शकतो

दुसऱ्या कसोटीत शानदार अर्धशतक झळकावणाऱ्या अजिंक्य रहाणेला तिसऱ्या सामन्यात 5000 कसोटी धावा पूर्ण करण्याची संधी आहे. 81 कसोटी सामन्यांच्या 138 डावांमध्ये त्याने 39 च्या सरासरीने 4921 धावा केल्या आहेत. त्याला 5 हजार धावा पूर्ण करण्यासाठी 79 धावांची गरज आहे. त्याचवेळी रहाणेने दक्षिण आफ्रिकेत त्याच्याविरुद्ध 5 कसोटी सामन्यात 392 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत त्याच्याकडे 500 धावा पूर्ण करण्याची संधी असणार आहे. याशिवाय रहाणेने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 12 कसोटी सामन्यांमध्ये 874 धावा केल्या आहेत. तो प्रोटीजविरुद्ध कसोटीत 1000 धावाही पूर्ण करू शकतो.

पुजाराही हा विक्रम करू शकतो

दुसऱ्या कसोटीत शानदार अर्धशतक झळकावून फॉर्म परत मिळवणाऱ्या चेतेश्वर पुजाराला तिसऱ्या कसोटीत आपल्या नावावर दोन विक्रम करण्याची संधी आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 16 कसोटी सामन्यांमध्ये 830 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1000 धावा पूर्ण करण्याची संधी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT