Virat Kohli 500th Match In International Cricket: भारतीय संघाच्या दिग्गज क्रिकेटपटूंपैकी एक म्हणजे विराट कोहली. रेकॉर्ड करणं आणि रेकॉर्ड मोडणं हे या खेळाडूसाठी खूप सोपं आहे.
अनेक मोठ मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर करणाऱ्या विराटच्या नावे आणखी एका महरेकॉर्डची नोंद होणार आहे. २० जुलैपासून भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याला प्रारंभ होणार आहे. हा कसोटी सामना विराटसाठी अतिशय खास असणार आहे. (Virat Kohli 500 Match)
हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ५०० वा सामना असणार आहे. विराटने १८ ऑगस्ट २००८ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. देशासाठी १ सामना खेळणं मोठी गोष्ट असते. अशात विराट भारतीय संघासाठी ५०० वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
सचिनपेक्षा विराट पुढे..
भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर २२ सप्टेंबर २००६ रोजी आपला ५०० वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यावेळी त्याने ५०० सामन्यांमध्ये ४८.५१ च्या सरासरीने २४८३९ धावा केल्या होत्या. तर विराटने आतापर्यंत ५३.४८ च्या सरासरीने २५४६१ धावा केल्या आहेत. विराट याबाबतीत सचिनपेक्षा ६२२ धावांनी पुढे आहे.
सचिनचा रेकॉर्ड मोडण्याची संधी..
सचिन तेंडुलकरने ५०० सामन्यांपर्यंत ७५ शतके झळकावली होती. तर विराट कोहलीने आतापर्यंत ७५ शतके झळकावली आहेत. शतकांच्या बाबतीत दोघेही बरोबर आहेत. मात्र ५०० व्या सामन्यात शतक झळकावून तो सचिनला मागे सोडू शकतो. (Latest sports updates)
भारतीय संघासाठी सर्वाधिक सामने..
विराट कोहली हा ५०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा चौथा भारतीय ठरणार आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा रेकॉर्ड हा सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिनने ६६४ सामने खेळले आहेत.
तर माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीने ५३४ आणि राहुल द्रविडने ५०३ सामने खेळले आहेत. तर विराट कोहली या यादीत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. लवकरच तो एमएस धोनी आणि राहुल द्रविडचा विक्रम मोडून काढू शकतो.
विराट कोहलीची कारकीर्द..
विराट कोहलीने तिन्ही फॉरमॅटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याने ११० कसोटी सामन्यांमध्ये ४८.८८ च्या सरासरीने ८५५५ धावा केल्या आहेत. तर वनडे क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत १२८९८ धावा केल्या आहेत.
तसेच टी -२० क्रिकेटमध्ये देखील त्याची जादू पाहायला मिळाली आहे. त्याने आतापर्यंत ४००८ धावा केल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.