Vinod Kambli /file  SAAM TV
क्रीडा

Team India : अवघ्या ३० हजारांत घरखर्च चालवतो, आता टीम इंडिया निवडणार; पाहा कोण-कोण आहे इच्छुक

टीम इंडियाच्या निवड समिती प्रमुखपदासाठी अनेक दिग्गज खेळाडू इच्छुक आहेत.

Nandkumar Joshi

Team India, BCCI Chief Selector Post : टी २० वर्ल्डकप २०२२ स्पर्धेत टीम इंडियाचा सेमिफायनलमध्ये पराभव झाला. त्यानंतर बीसीसीआयनं पहिली मोठी कारवाई निवड समितीवर केली. संपूर्ण निवड समिती बरखास्त केली. त्यानंतर आता पुन्हा निवड समिती नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. रिपोर्टनुसार, माजी फिरकी गोलंदाज मनिंदर सिंह, शिवसुंदर दास, सलील अंकोला, समीर दीघे आदी खेळाडू टीम इंडियाच्या निवड समिती प्रमुखपदासाठी इच्छुक आहेत. निवड समितीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत सोमवार संध्याकाळी सहा वाजेपर्यंत होती. आतापर्यंत ५० हून अधिक इच्छुकांनी अर्ज केले आहेत. यात विनोद कांबळीचंही नाव असल्याचं समजतं.

विनोद कांबळी हा टीम इंडियाच्या निवड समिती प्रमुखपदासाठी इच्छुक आहे. अलीकडेच विनोद कांबळीनं आपल्या आर्थिक परिस्थितीबाबत जाहीरपणे सांगितले होते. बीसीसीआयकडून मिळणाऱ्या पेन्शनवर आपला घरखर्च चालतो असं तो म्हणाला होता. बीसीसीआयकडून कांबळीला ३० हजार रुपये पेन्शन मिळत आहे. एका वृ्त्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपण बेरोजगार असल्याचं तो म्हणाला होता. (Latest Marathi News)

सचिननं दिलं होतं काम

कांबळीचा जवळचा मित्र सचिन तेंडुलकर यानंही त्याला काम दिलं होतं. सचिननं त्याला मिडलसेक्स ग्लोबल अकादमीचा मेंटॉर केलं होतं. मात्र, कांबळीनं ती नोकरी सोडली होती. तो रोज सकाळी पाच वाजता डीवाय पाटील स्टेडियमसाठी कॅबने जात होता. त्याचवेळी बीकेसी मैदानात तो मुलांना प्रशिक्षण देत होता. त्यामुळं दगदग होत होती. त्यामुळं नोकरी सोडल्याचं कांबळीनं सांगितलं होतं. आता कांबळीनं टीम इंडियाचा निवड समिती प्रमुख होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (Sports News)

विनोद कांबळीला होणार अनुभवाचा फायदा?

विनोद कांबळीनं १७ कसोटी सामने खेळले आहेत. त्यानं ५४.२ च्या सरासरीनं १०८४ धावा केल्या आहेत. कांबळीनं यात चार शतके ठोकली आहेत. त्यात दोन द्विशतकांचा समावेश आहे. भारतासाठी त्यानं १०४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यानं ३२.५९ च्या सरासरीनं २४७७ धावा काढल्या आहेत. वनडेमध्ये दोन शतके आणि १४ अर्धशतके केली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News : नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का; माजी महापौर करणार ठाकरे गटात प्रवेश

Winter Fashion Tips :हिवाळ्यात Cool अन् Cozy लूक हवाय? 'या' फॅशन टिप्स फॉलो करा, प्रत्येकजण तुम्हाला पाहून वेडा होईल

satyanarayan vrat 2024: सत्यनारायणाची पूजा करायचीय? या महिन्यातील हा दिवस शुभ, जाणून घ्या मुहूर्त आणि विधी

Kanguva Movie Review: दमदार ॲक्शनवाला सूर्या आणि बॅाबी देओलचा 'कांगुवा ' प्रदर्शित, प्रेक्षकांना कसा वाटला चित्रपट जाणून घ्या

Durga Serial: दुर्गा आणि अभिषेकच्या नात्यात येणार दुरावा? मालिकेमध्ये नेमकं असं काय घडणार?

SCROLL FOR NEXT