Vinod kambli Saam tv
Sports

Vinod Kambli : विनोद कांबळीची प्रकृतीत सुधारणा नाहीच, चालणंही मुश्किल; व्हिडिओमुळं फॅन्स भावुक

Vinod Kambli Health Update: विनोद कांबळीवर ठाण्यात उपचार सुरु आहेत. त्याच्या अवस्थेमध्ये सुधारणा होत नसल्याने चाहत्यांची चिंता वाढली आहे.

Saam Tv

Vinod Kambli Health Update: विनोद कांबळी मागील काही दिवसांपासून आजारी आहे. तो ठाण्यातील आकृती रुग्णालयात उपचार घेत आहे. अचानक तब्येत बिघडल्याने कांबळीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. साधारण आठवडा होत आला तरी त्याच्या प्रकृतीमध्ये फारसा फरक पडत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच कांबळीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमधील त्याची अवस्था पाहून चाहत्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे.

अनेक दिग्गज मंडळींनी विनोद कांबळीची रुग्णालयात भेट घेतली. भेट घेणारी प्रत्येक व्यक्ती कांबळीच्या आरोग्याची माहिती देत होता. त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे संकेतही मिळत होते. रुग्णालयात त्याने कुटुंबियांसह नाताळ साजरा केला. या सेलिब्रेशनचा व्हिडीओ समोर आला. व्हिडीओ पाहून कांबळीच्या अवस्थेमध्ये सकारात्मक बदल होत आहे असे वाटू लागले. पण अशातच त्याच्या नव्या व्हिडीओमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. या व्हिडीओत कांबळी डॉक्टराचा हात पकडून चालत असल्याचे दिसते. तो उभा राहताना अडखळ असताना दिसतो.

आजारी विनोद कांबळीची अवस्था पाहून त्याची मदत करण्यासाठी अनेकजण पुढे आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५ लाख रुपयांची मदत देऊ केली. तर प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या वानरसेना संस्थेतर्फ जमा केलेले २५ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले. ही रक्कम लवकरच त्याच्या पत्नीच्या खात्यात जमा होतील असेही त्यांनी सांगितले. शिवाय गंगुबाई शिंदे रुग्णालय, इंदिराबाई बाबुराव सरनाईक हॉस्पिटल आणि आकृती हॉस्पिटल हे तीनही रुग्णालय प्रत्येक वेळी उपचारासाठी कटिबद्ध असणार आहेत, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

तापाने फणफण असताना विनोद कांबळीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा स्नायूसंबंधित त्रास होत असून चक्कर येत होती. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर विनोदच्या मेंदूमध्ये गुठळ्या झाल्याचे स्पष्ट झाले. त्याला रक्ताभिसरणामध्येही त्रास सुरु होता. आयसीयूमध्ये दाखल केल्यानंतर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरु केला. त्याच्या मेंदूची स्थिती सध्या अस्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tamarind Leaf Recipe: चिंचेच्या पानांची अस्सल गावरान भाजी, एकदा नक्की करून बघा

Shoking News : घातपात की आयुष्य संपवलं? बंद घरात सापडले ४ मृतदेह, मृत्यूचं कारण गुलदस्त्यात

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारा हा मेळावा | VIDEO

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

SCROLL FOR NEXT