virat kohli yandex
Sports

Vinod Kambli Birthday: करिअरची ‘जादूई’ सुरुवात; सचिनलाही मागे सोडलं, पण एक चूक कांबळीला महागात पडली

Vinod Kambli Birthday Special: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी आज आपला ५३ वा वाढदिवस साजरा करतोय. दरम्यान जाणून घ्या त्याच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल खास गोष्टी.

Ankush Dhavre

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी आपलया आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखला जायचा. आज तो आपला ५३ वा वाढदिवस साजरा करतोय. क्रिकेटसह ग्लॅमर आणि आपल्या हटके स्टाईलसाठी ओळखला जाणारा कांबळी, एकदा संघाबाहेर पडल्यानंतर कमबॅक करुच शकला नाही.

कांबळीचा जन्म १८ जानेवारी १९७२ रोजी मुंबईत झाला. यावर्षी वानखेडे स्टेडियमला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक क्षणी कांबळीचा सन्मान करण्यात आला. दरम्यान कांबळीच्या वाढदिवशी जाणून घ्या, त्याने केलेले खास रेकॉर्ड्स.

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी एकत्र क्रिकेट खेळायला सुरुवात केली. दोघेही शालेय स्तरावर, त्यानंतर मुंबई संघात आणि भारतीय संघातही एकत्र खेळले. कांबळीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला १९९३ मध्ये सुरुवात केली. त्याला इंग्लंडविरुद्ध पदार्पण करण्याची संधी मिळाली.

कारकिर्दीच्या सुरुवातीलाच त्याने दमदार कामगिरी करुन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या आक्रमक फलंदाजाने सुरुवातीच्या ४ कसोटी सामन्यांमध्ये २ दुहेरी शतकं झळकावली. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात टॉप गिअरमध्ये झाली होती. मात्र त्याला कामगिरीत सातत्य ठेवता आलं नाही.

या बाबतीत कांबळी सचिनलाही सोडतो मागे

विनोद कांबळीच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याला १७ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने ५४.२० च्या सरासरीने १०८४ धावा केल्या. त्याला ४ शतक आणि ३ अर्धशतक झळकावण्यात यश आलं. कसोटी क्रिकेटमध्ये विनोद कांबळीच्या नावावर अशा रेकॉर्डची नोंद आहे, जो आजवर कोणालाच मोडता आलेला नाही.

कांबळीने अवघ्या १४ डावात १००० धावा पूर्ण करत सर्वात जलद १००० धावा करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता. हा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरलाही मोडता आलेला नाही. यशस्वी जयस्वालला हा रेकॉर्ड मोडण्याची संधी होती. मात्र त्याला हा रेकॉर्ड मोडता आला नाही. त्याने १६ डावात १००० धावा पूर्ण केल्या.

कांबळीच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट कोणता?

कांबळीला कमी वयात चांगलंच यश मिळालं होतं. काहींच्या मते तो सचिनलाही मागे टाकू शकतो, असं म्हटलं जात होतं. मात्र मद्यपान, पार्ट्या आणि ग्लॅमरमुळे त्याला अडचणींचा सामना करावा लागला. वनडेमध्ये त्याला १०४ सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने ३२.५९ च्या सरासरीने २४७७ धावा केल्या. त्याला २००० मध्ये भारतीय संघासाठी शेवटचा सामना खेळण्याची संधी मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

SCROLL FOR NEXT