Wrestler Vinesh Phogat:  India Today
क्रीडा

Paris Olympics: विनेशचं वजन वाढलं की वाढवलं? विनेशसोबत कुणी केला वजनाचा 'खेळ'?

Tanmay Tillu

भारताच्या ऑलिम्पिक मोहिमेला मोठा धक्का बसलाय. ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये प्रवेश करणारी पहिली महिला कुस्तीपटू ठरलेल्या विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आलं. आणि सा-या देशालाच धक्का बसला. 50 किलो वजनी गटात खेळणाऱ्या विनेश फोगाटचं 100 ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे ती अपात्र ठरली. त्यामुळे आता हा निर्णय वादाच्या भोव-यात सापडलाय. विनेशला अपात्र ठरवण्यामागे काहीतरी षडयंत्र असल्याचा आरोप देशातल्या अनेक राजकीय पक्षांनी केलाय. तसंच या निर्णयाच्या चौकशीही मागणी करण्यात आलीय.

तर भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांनीही या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त केलंय. आधीच्या दोन लढतीत विनेशचं वजन 50 किलोच्या आत असताना एका रात्रीत वजन कसं वाढलं ? असा सवाल करत त्यांनी विनेशच्य़ा न्यूट्रीशनिस्टकडे बोट दाखवलंय. दरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत विनेश फोगटबाबतच्या निर्णयाला आव्हान देण्याची मागणी केलीय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडियन ऑलिम्पिकच्या अध्यक्षा पीटी उषांशी फोनवरून संवाद साधला. विनेश फोगाट अपात्रतेविरोधात अपील करण्याच्या सूचनाही मोदींनी पीटी उषा यांना दिल्यात. त्यानुसार विनेशला अचानक अपात्र ठरवल्यामुळे काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

विनेशच्या अपात्रतेवर काही सवाल

फायनलच्या आधीच वजन कसं वाढलं?

फायनलच्या तणावामुळे वजन वाढलं?

ही सपोर्ट स्टाफची चूक आहे का?

विनेशविरोधात षडयंत्र रचलंय का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

फायनलमध्ये धडक मारण्यासाठी विनेशनं जबरदस्त मेहनत केली होती. तिनं गेल्यावेळची ऑलिम्पिक विजेती आणि चार वेळा विश्वविजेती असलेल्या युई सुसाकीला चितपट केलं होतं. आधीच्या दोन्ही सामन्यांमध्ये तिचं वजन योग्य होतं. तर मग अचानक वजन कसं वाढलं. याला जबाबदार कोण आहे याची संपूर्ण चौकशी व्हायला हवी. कारण प्रश्न केवळ ऑलिम्पिक पदाकाचाच नाही तर देशाच्या प्रतिष्ठेचाही आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

SCROLL FOR NEXT